ओल्या पार्टीत मित्रांनीच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:00 AM2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:12+5:30

अभिनय ऊर्फ अभिमन्यू नंदकिशोर माने (२३), रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, असे मृत तरुणाचे नाव आहे. बघेडा येथील कुलदीप डोंगरे याच्या घरी सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुलदीपचे नागपूर येथील चार मित्रही सहभागी झाले होते. तेथे अभिनयलाही बोलाविण्यात आले होते. त्यानुसार अभिनय तुमसरमधील आपल्या दोन मित्रांना घेऊन बघेडा येथे गेला. पार्टी सुरू असताना आठ दिवसांपूर्वी आंबागढ येथे झालेल्या भांडणाचा मुद्दा निघाला.

At a wet party, a friend killed his friend | ओल्या पार्टीत मित्रांनीच केला मित्राचा खून

ओल्या पार्टीत मित्रांनीच केला मित्राचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देबघेडा येथील घटना : रॉड व चाकूने खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आठवडाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी ओल्या पार्टीत बोलावून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्यातील बघेडा येथे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास रॉडने वार करून आणि चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यानंतर गावालगतच्या नाल्यात मृतदेह फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
अभिनय ऊर्फ अभिमन्यू नंदकिशोर माने (२३), रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, असे मृत तरुणाचे नाव आहे. बघेडा येथील कुलदीप डोंगरे याच्या घरी सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुलदीपचे नागपूर येथील चार मित्रही सहभागी झाले होते. तेथे अभिनयलाही बोलाविण्यात आले होते. त्यानुसार अभिनय तुमसरमधील आपल्या दोन मित्रांना घेऊन बघेडा येथे गेला. पार्टी सुरू असताना आठ दिवसांपूर्वी आंबागढ येथे झालेल्या भांडणाचा मुद्दा निघाला. त्यातून अभिनयसोबत वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने एकमेकांना मारहाण सुरू झाली. वाद चिघळत असल्याचे पाहून अभिनयच्या तुमसर येथील दोन मित्रांनी पळ काढला. 
इकडे अभिनय रात्रभर घरी आला नाही त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. गोबरवाही आणि तुमसर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. 
अभिनयचा खून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला. बघेडा गावाजवळील नाल्यात अभिनयचा जळालेला मृतदेह आढळून आला. अभिनयचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळला असावा, असा संशय पोलिसांना आहे. 
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

एक तरुण ताब्यात; नागपूरच्या मित्रांचा शोध सुरू

अभिनयच्या खून प्रकरणात कुलदीप डोंगरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजेच त्याच्याच घरी या ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच पोलिसांचे एक पथक नागपूर येथे रवाना झाले असून, कुलदीपच्या नागपूर येथील मित्राचा शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अधिक तपास गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.

 

Web Title: At a wet party, a friend killed his friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.