लग्न सराईत वऱ्हाड्यांना उन्हाच्या झळा

By Admin | Updated: May 14, 2015 00:28 IST2015-05-14T00:28:10+5:302015-05-14T00:28:10+5:30

लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे.

Wedding saritya paraphrates to see the sunshine | लग्न सराईत वऱ्हाड्यांना उन्हाच्या झळा

लग्न सराईत वऱ्हाड्यांना उन्हाच्या झळा

नागरिक त्रस्त : मुहूर्तावर लग्न लागत नसल्याने बच्चे कंपनींना फटका, समारंभावर विरजण
लाखनी : लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे. दिवसभर रखरखते उन्ह तर संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे लग्न घरी ऐनवेळेवर धावपळ सुरू होत आहे. हवामानाचा अंदाज लावता येत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व उन्हाच्या झळांचा फटका वऱ्हाड्यांना बसत आहे.
सध्या लग्न समारंभाचा हंगाम जोरात सुरु आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्यात लग्नसराईची धूम असते. उन्हाळ्याच्या दिवसात पाहूणेमंडळीची सोय चांगल्या प्रकारे करता येते.
उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरीही निवांत असतात. त्यामुळे पूर्वीपासून ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात लग्न समारंभ ठेवण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक हालचालीवरदेखील याचा परिणाम पडत असल्याचाच प्रत्यय येत आहे.
सकाळपासून निरभ्र असणाऱ्या आकाशात सायंकाळी दाट ढग दाटून येत आहेत. ऐन वेळेवर दररोज सायंकाळी वादळी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. विवाह कार्यक्रम असलेल्या घरी तर चांगलीच तारांबळ उडत आहे.
सकाळच्या मुहूर्तावर असलेले लग्नसमारंभ सुरळीत चालत असले तरी सायंकाळच्या कार्यक्रमासाठी देवापुढे नतमस्तक होण्याची वेळ येत आहे. हजारो रुपये खर्च करून बँड, पाणीव्यवस्था, कपडे खरेदी आचारी साऊंड सिस्टीम आदी गोष्टीची जुळवाजुळव करण्याऱ्या वधूपित्याला डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली आहे. दिवसभर उन्हामुळे नागरीत त्रस्त आहेत तर सायंकाळी वाऱ्यामुळे तारांबळ उडत आहे. लग्नसराईचे दिवस असले तरी वातावरणातील बदलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. निसर्ग व लग्न वऱ्हाड्यांमळे लग्न समारंभात विरजन पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)

उन्हाच्या तीव्रतेने त्वचेचे आजार वाढले
भंडारा : मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हात फिरणे टाळावे, बाहेर जातांना डोक्याला रूमाल बांधून जावे आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. ताप, सर्दी आणि डोके दुखीची लक्षणे दिसताच त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
हवामानाचे चक्र पाहता उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आहार, विहार, सेवन या सर्वच बाबतीत काही काळजी घेणे, पथ्ये पाळणे गरजेचे ठरत आहे. प्रामुख्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढते. पाण्याचे स्रोत कमकुवत होतात. पाणी योजना असूनही पुरेसे पाणी मिळत नाही. जे पाणी येते ते दूषित असल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच पाण्याच्या पुरवठ्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात बाहेर पडतांना डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा गुलाब पाणी व काकडी लावावी जेणे करून डोळ्यांची दाहकता कमी होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने डोळे कोरडे पडणे, अँलर्जीचा परिणाम जास्त असतो. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी सन गॉगल्स वापरावेत, बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवावेत, तसेच उन्हाळ्यात उष्णतावर्धक पदार्थ खाणे टाळावेत, शीतपेयापेक्षा लिंबू सरबत, बडीशेपचे सरबत घ्यावे, माठातील पाणी प्यावे, पाणी गाळून प्यावे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.

Web Title: Wedding saritya paraphrates to see the sunshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.