वनौषधी कालबाह्य होण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: September 13, 2014 23:40 IST2014-09-13T23:40:20+5:302014-09-13T23:40:20+5:30

सातपुडा पर्वतरांगेतील जटील निसर्गसंपदेने बहरलेल्या नाकाडोंगरी, जांब कांदयी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रात राखीव व संरक्षीत वनात सातत्याने वनअतिक्रमणात वाढ झाली आहे. टेकडीवरील गौण वनउपज

On the way to the herbal expiry | वनौषधी कालबाह्य होण्याच्या मार्गावर

वनौषधी कालबाह्य होण्याच्या मार्गावर

आलेसूर : सातपुडा पर्वतरांगेतील जटील निसर्गसंपदेने बहरलेल्या नाकाडोंगरी, जांब कांदयी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रात राखीव व संरक्षीत वनात सातत्याने वनअतिक्रमणात वाढ झाली आहे. टेकडीवरील गौण वनउपज संपत्तीचे खच्चीकरण वृक्षतोड व वनव्यामुळे अपरिमित नुकसाान होऊन वनक्षेत्रात वनऔषधींची कमालीची घट निर्माण झाली आहे.
अधिक भर म्हणून नव्याने वनसेवत दाखल झालेले वनरक्षक आपल्या अधिनस्थ असलेल्या चौकीदारांची सहायता घेऊन वन कक्षातील वृक्ष प्रजातींची ओयख करून घेण्यात मशगूल आहेत. परिणामी शासनाने वनसेवेतील वनशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्चीत केल्यावरही ही बोंब पुढे आल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या संबंधी परिसरातील पान टपरी व चावडीवर ज्येष्ठ नागरिक वनविभागातील यंत्रणेची चालीसा पठण करीत असल्यामुळे लोकमतने ही बाबू टिचून काढली आहे. महाराष्ट्रात ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किमी क्षेत्रात ६१ हजार ९३९ चौरस कि.मी. वनक्षेत्र आहे. राज्यात सद्यस्थितीत २२ टक्के वन शेष असून त्यातील १८ टक्के जंगल केवळ विदर्भात आहेत.
उत्तर ते दक्षिण सीमांकनापर्यंत असलेल्या व्यापक सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदाट जंगले असून त्यात महत्वाच्या जीवनोपयोगी वन औषधी आहेत. मात्र सन २००८ ला केंद्र शासनाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदा अस्तित्वात आणल्यावर जनतेने या रोपवन क्षेत्रात अतिक्रमण करून जैवविविधतेला हानी निर्माण केली आहे. त्यामुळे जंगलातील कित्येक दुर्मिळ वनस्पतीचे पतन झाले आहे.
१९८५ ते ९२ या सात वर्षाच्या कालावधीत या वनक्षेत्रात प्रचंड प्रमाणात आवळा, बेहडा, तेंदूफळ, कवठ, गुडवेल, काळी मुसळी, पहाडवेल, हाडजोड (कांडवेल), शतावरी, माहुरवेल, चंद्रज्योती, पळसवेल, संजीवनी, बिबा इत्यादी वृक्ष व बहुगुणी वनसप्ती जंगलात आढळत होती. परिणामी परिसरात प्रत्येक गावात वन औषधी देणारे वैद्य, भूमक, हकीम, भगत असायचे. त्यामध्ये ते संपूर्ण गावकऱ्यांचे आरोग्याची काळजी घ्यायचे व बरेच आजार जडीबुटीने बरे करायचे. मात्र अल्पशा काळातच परिसरातील अतिक्रमणीकरण व वनाकडे गरजा सोयी सुविधा हा उदासीन धोरणामुळे मोठ्या प्रमाणात या वनक्षेत्रात वन औषधी जमा होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: On the way to the herbal expiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.