शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

तलावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:17 AM

तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. असेच चित्र राहले तर भविष्यात पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन व ग्राम पंचायतचे दुर्लक्षित धोरण : जलसंकटाला निमंत्रण दिल्याचीच चर्चा

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. असेच चित्र राहले तर भविष्यात पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत.वरठी येथे असलेल्या विशाल तलावात चिमूटभर पाणी नाही. तलावाची देखभाल दुरुस्ती व त्याचे जतन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला अपयश आले आहे. ग्राम पंचायतचे दुर्लक्षित धोरण व जलसाक्षरता अभावाने जलसंकट अटळ आहे.वरठी परिसरात तीन तलाव आहेत. यासह वरठी लागून असलेल्या एकलारी, सोनुली, पाचगाव, भागातही तलाव आहेत. या व्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या बोड्या होत्या. पण त्यावर अतिक्रमण करून त्या बुजवण्यात आल्या. दोन दशकांपूर्वी बाराही महिने चारही दिशेला दिसणारे पाणी फक्त घरी लावलेल्या नळापुरते मर्यादित झाले आहे. वरठी येथील दोन्ही तलावाची अवस्था बिकट आहे. दोन वर्षांपूर्वी तलावाची पाळ फुटल्याने निर्माण झालेली परिस्थिती जैसे थे आहे. तलावाची पाळ बांधण्यात आली. पण तलावात मूठभर पाणी नाही. तलावाची अवस्था पाहून जिल्ह्यात राबवण्यात येणारे योजना फक्त कागदावर असल्याचे प्रत्येय येतो.तलावा लगत शेकडो एकर शेती आहे. विशाल तलावाच्या काठावर असलेल्या शेतीला हंगामी पीकशिवाय पीक घेता येत नाही यापेक्षा शेतकऱ्याचे दुर्देव कोणते. गावाच्या मध्यभागी रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आणि गावाच्या बाहेर मोहगाव शेत शिवारात दोन तलाव आहेत. या तिन्ही तलावांची अवस्था फार वाईट आहे. अनेक वर्षांपासून प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष व जलसाक्षरतेबाबाद ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण हे भविष्यातील पाणी संकटाला आमंत्रण देणारे ठरणार आहे. अतिक्रमनाणे विशाल तलावांना डबक्याचे स्वरूप आले आहे. वेळीच उपाय योजना न केल्यास तलावाच्या जिल्ह्यातील हे तलाव लुप्त होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून असणारी ओळख इतिहासाच्या पानावर फक्त उरेल, यात शंका नाही.वरठीच्या चारही बाजूला असलेल्या तलावातील पाण्यामुळे गावातील पाण्याची पातळी व्यवस्थित होती. पण अनेक वर्षांपासून तलावात असलेल्या पाण्याच्या ठणठणाट परीस्थीने गावातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. गावाच्या मध्यभागी असलेले इंग्रजकालीन तलावामुळे काही प्रमाणात भूगभार्तील पाण्याची पातळी कायम ठेवण्यास मदत करते. पण तलावाची देखभाल दुरुस्तीत होणारी हयगय जलसंकट निर्माण करण्यास कारणीभूत ठरणार आहे.तलावाचे स्वरूप हे खोल आणि चारही बाजूला काठ असे असते. पण वरठी येथे असलेल्या तलावाला काठच नाही. दोन्ही तलावाच्या एका बाजूला तात्पुरते पाणी असून राहील असे काठ असून उर्वरित तिन्ही दिशेला काठ नाहीत. जास्तकाळ पाणी साठवून राहावे म्हणून तलावाची रचना हि खोल असते पण सदर तलाव पूर्णत: सपाट आहेत. विचित्र व दुर्मिळ म्हणून या तलावाची नोंद होऊ शकते. पावसाचे पाणी साठून राहावे व उन्ह्याळ्यात त्याचा उपयोग करता व्यवस्था नाही. सपाट व काठ नसलेल्या तलावात पाणी कस साठवणार याचा विसर प्रशासनाला पडल्याचे जाणवते.विस्तीर्ण तलावात ओंजळभरही पाणी नाहीवरठी नजीक मोहंगाव शेतशिवारात असलेले नवीन तलाव म्हणून ओळखला जातो. जवळपास २० एकर जागेत असलेले प्रसस्त तलावात चिमूटभर पाणी नाही. गतवर्षी सप्टेंबर २०१६ मध्ये तलावाची पाळ फुटल्यामुळे तलाव कोरडे पडले. तलावाची पाळ बांधण्यात आली पण तलावात पाणी साचून राहावे यासाठी उपाययोजना करण्यात आली नाही. २० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेले हे तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे ज्या वर्षी हे तलाव तयार झाले तेव्हा पासून एकही वेळा या तलावाची देखभाल दुरुस्ती झाली नाही. पण कार्यालयीन दफ्तरी यादीत अनेक वेळा खर्च झाल्याचे माहीत आहे. सदर तलाव जिल्हा परिषदच्या लघु पाटबांधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेकडो शेतकरी अवलंबून आहेत.तलावाचे डबक्यात रूपांतरनवीन तलावाच्या काही अंतरा पूर्वी दुसरा छोटा तलाव आहे. जवळपास १२ एकरात वसलेल्या या तलावाची अवस्था सारखीच आहे. सध्या रोजगार हमी योजने अंतर्गत या तलावाचे गाळ स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे. या कामावर ५५० मजुरांना काम मिळाले. मात्र १२ एकर जागेत विस्तारलेल्या या तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. गाळ स्वच्छते बरोबर तलावाचे खोलीकरण करणे महत्वाचे आहे. पण वास्तव्यात असे होताना दिसत नाही. दोन दशकांपूर्वी दोन्ही तलावाच्या पाण्यापासून वरठी सह मोहंगाव, सोनूली, बोथली व पाजरा या गावातील शेती पीक व्हायचे. तलावाच्या ओव्हर फ्लो चे पाणी नाहराच्या माध्यमातून दहा किमी अंतरापर्यंत जात होते. ते नहर अतिक्रमणाने बुझवण्यात आले. यामुळे तलावाचे पाणी काही ठरविक शेतकºयाची मक्तेदारी पुरती मर्यादित राहीली.न आटणारा तलावगावाच्या मध्यभागी विशाल तलाव आहे. उष्णतेचा पारा कितीही वर जाऊ दे वरठीच्या मध्यभागी असलेला तलाव कधीच आटत नाही. सदर तलाव रेल्वे च्या अखत्यारीत आहे. या तलावाची अवस्था फार वाईट होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून वेगवेगळ्या प्रकारच्या वाढलेल्या वनस्पतीमुळे तलावाला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजतायगत तलावाची एकदाही गाळ उपसा न झाल्यामुळे पाणी दूषित झाल्यासारखे दिसते. तलावात भरपूर पाणी असूनही त्यात पसरलेली घाणीमुळे निरुपयोगी ठरत आहे. गावातील घाण व कचरा टाकल्यामुळे दुगंर्धी पसरली आहे. सनफ्लॅग कंपनीने या तलावाचे सौदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले. पण कामाची गती कासवापेक्षा हि कमी आहे. आठ वर्षांपासून सौदर्यीकरणाचे काम पुढे सरकताना दिसत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई