शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या जिल्ह्यातील ६३९ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:06 IST

संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देउपाययोजना शून्य : तलाव आटले, विहिरींनी तळ गाठला, पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आतापर्यंत उपाययोजना शून्य आहे.भंडारा जिल्ह्यात १३०० वर तलाव आहे. गावागावांत तलाव असल्याने हा जिल्हा टँकरमुक्त म्हणून प्रशासनाने घोषित केला. परंतू जिल्ह्यातील तब्बल ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. अनेक गावात नळयोजना असल्या तरी या नळयोजनांनाही घरघर लागली आहे. गावाजवळचे बोडी, तलाव आटले आहे. हातपंपाना तासनतास हापसल्यानंतर बकेटभर पाणी मिळते. विहिरींनीही तळ गाठला आहे. डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेल्या नळयोजनाही कुचकामी ठरत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. मोहगाव खदान गावात वारंवार कुत्रीम टंचाई निर्माण होत आहे. येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्धे गाव पाण्यासाठी भटकंती करताना दिसते. पवनी तालुक्यातील चौरस भाग हा सुपीक जमीन आणि पाण्यासाठी प्रसीध्द होता. मात्र वैनगंगा नदीवर गोसेखुर्द येथे धरण झाल्यानंतर या भागातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. धरण उसाला आणि कोरड घसाला अशी अवस्था या भागाची झाली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी, पिंडकेपार या परिसरातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृतीआराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. मात्र एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने याकडे दुर्लक्ष झाले.भंडारा शहरात नळाला केवळ अर्धातास पाणीभंडारा शहराला वैनगंगा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविल्या जाते. गत महिन्याभरापासून शहरातील नळांना सरासरी अर्धा तास पाणी मिळते. उंच असलेल्या भागात तर दहा ते पंधरा मिनिटच नळाला पाणी येते. त्यामुळे दिवसभराचे पाणी साठवून कसे ठेवावे असा प्रश्न आहे. शहरातील जलवाहिन्यांची अवस्था बिकट असून दुषीत पाणी पुरवठाही होत आहे. काही वॉर्डात ठिकठिकाणी जलवाहिनीचे पाईप फुटलेल्या स्थितीत आहे.भूजलपातळी गेली ३०० फूट खालीभंडारा जिल्ह्यातून जीवनदायी वैनगंगा बारमाही वाहते. मात्र गत काही वर्षांपासून भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. चुलबंद नदीतिरावरील अनेक गावात भूजलपातळी ३०० फूटापर्यंत खाली गेली आहे. ३०० फूट बोरवेल खोदल्यावरही पाणी लागत नाही. पाण्याचा वारेमाप उपसा आणि जलपुर्नभरणाकडे दुर्लक्ष यामुळे भूजल पातळीत झपाट्याने खाली जात आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असले तरी त्या सर्व उपाययोजना कागदावर असल्याचे दिसून येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई