‘त्या’ तलावातील पाणी दूषित

By Admin | Updated: July 27, 2016 00:35 IST2016-07-27T00:35:42+5:302016-07-27T00:35:42+5:30

जिल्हा परिषद मालकीच्या तलावात हजारो मास्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रूग्णालयाने मंगळवारी पाण्यासंदर्भात अहवाल दिला

The water in the 'lake' is contaminated | ‘त्या’ तलावातील पाणी दूषित

‘त्या’ तलावातील पाणी दूषित

रुग्णालयाचा अहवाल : प्रयोगशाळेकडे पाणी व मृत मासे पाठविले
तुमसर : जिल्हा परिषद मालकीच्या तलावात हजारो मास्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रूग्णालयाने मंगळवारी पाण्यासंदर्भात अहवाल दिला. तर दोन दिवसांनी भंडारा तथा नागपूर येथील प्रयोगशाळेचा अहवाल मिळेल.
मालवीय, आझाद वॉर्डात जिल्हा परिषदचा जुना तलाव आहे. रविवार व सोमवारी तलावातील मासे मृत्यूमुखी पडले. माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी तलावातील पाणी तुमसरच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. पाणी गढूळ असल्याचा अहवाल आला. भंडारा व नागपूर येथील प्रयोगशाळेत तलावातील पाणी व मृत मास्यांचे नमुने पाठविले. माशांचा मृत्यू कशामुळे झाला अहवालानंतर कळेल. (तालुका प्रतिनिधी)

उपजिल्हा रुग्णालयातील पाण्याच्या नमुन्याबद्दल पाणी गढूळ असल्याचा अहवाल मंगळवारी मिळाला. दूषित पाण्यामुळे माशांना आॅक्सीजन मिळाले नाही. त्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा. फॉरेन्सीक अहवालानंतरच सत्यता कळेल.
-डॉ.एम.ए. कुरैशी, तालुका आरोग्य अधिकारी, तुमसर
तलावातील पाणी व मृत मासे परिक्षणाकरिता भंडारा व फॉरेन्सीक लॅब, नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. दोन दिवसानंतर अहवाल आल्यानंतर माशांचा मृत्यूचे नेमके कारण कळेल.
- शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी, तुमसर.

Web Title: The water in the 'lake' is contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.