वारेमाप वीज बिलाने जनता त्रस्त
By Admin | Updated: February 25, 2015 01:14 IST2015-02-25T01:14:24+5:302015-02-25T01:14:24+5:30
ग्राहक सुरक्षा कायद्याला तिलांजली देत स्वत:ची मनमानी चालवत महावितरणने ग्राहकांना वापरलेल्या विजेची मोजणी न घेता अव्वाच्यासव्वा वीज बिल ग्राहकाला देतात.

वारेमाप वीज बिलाने जनता त्रस्त
पालांदूर : ग्राहक सुरक्षा कायद्याला तिलांजली देत स्वत:ची मनमानी चालवत महावितरणने ग्राहकांना वापरलेल्या विजेची मोजणी न घेता अव्वाच्यासव्वा वीज बिल ग्राहकाला देतात. ते चुकिचे बिल न भरल्यास वारंवार ग्राहकाला वीज जोडणी कापण्याची तंबी देतात. यातून एखादवेळी ग्राहक कायदा मोडीत अनुचित घटना घडू शकतात. महावितरण आरएनए करिता उपाय शोधेल काय, असा प्रश्न वीज ग्राहकाला पडला आहे.
वरिष्ठांचा पाठबळ लाभत असल्याने कर्तव्यावर एकनिष्ठता दिसत नाही. शासन प्रशासन ही डोळेझाकपणा करीत असल्याने महावितरण जनतेकडून न वापरलेल्या विजेचे पैसे जबरदस्तीने वसुल करते. ग्रामीण भागात डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात घरगुती वीज वापर अत्यल्प असते. दोन बल्प असलेल्या घरी ८००० ते १०,००० हजार रुपयापर्यंत विजबिल देण्यात आले. बाळकृष्ण गोन्नाडे यांना २८ हजार ९०० रुपयांचे बिल दिले. भरण्याकरिता तगादा लावला जात आहे.
वीज बिल भरा नाहीतर वीज बंद करण्यात येईल असे सांगितले जात आहे. ग्राहकाने एवढ्या रकमेची वीज जाळलीच नाही तर त्याने भरायचा कसा कम् पुटर युगात पूर्वी वापरलेल्या युनिटची माहिती असते. त्याचा अभ्यास करून वास्तविकतेचा विचार करीत सुधारीत बिल देण्याची मागणी बाळकृष्ण गोन्नाडे यांनी वीज अभियंता आर.जी. बेले साकोली यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)