५०० हेक्टर क्षमतेच्या तलावांची लीज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:31 AM2019-02-24T00:31:42+5:302019-02-24T00:34:11+5:30

भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

Waive the lease of 500 hectares of capacity | ५०० हेक्टर क्षमतेच्या तलावांची लीज माफ

५०० हेक्टर क्षमतेच्या तलावांची लीज माफ

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : गोसे प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
भंडारा जिल्ह्यातील ५१८ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी साकोली येथे करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ५०० ते हजार हेक्टर क्षमतेच्या तलावांना ६०० तर हजार हेक्टरवरील तलावांसाठी ९०० रूपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थांनाच देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोसे प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नसून येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाला निधी दिल्यामुळे ५० हजार हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकºयांना १२ ते १४ तास वीज देण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली येथे तीन कोटी २३ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालय इमारतीचे लोकार्पण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडेगाव येथे चार कोटी ९९ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील विविध रस्ते आणि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्याला विजय राहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.
धानाच्या तणसापासून इथेनॉल -नितीन गडकरी
भंडारा येथे बॉयो एव्हीएशन फ्युल हब निर्माण करण्याचा माणस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेलॉनची निर्मिती होवून धानाला पर्याय मिळेल. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरूणांच्या हातांना काम मिळेल, शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री सडक योजनेत ७५० कोटींचे रस्ते
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ७५० कोटींचे रस्ते जिल्ह्याला देण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ४ लाख ६१ हजार परिवाराने शासकीय योजनांचा लाभ घेतला. दीड लाख शेतकऱ्यांना वर्ग २ ते वर्ग १ चा लाभ मिळाला. ९९ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगत भंडारा येथील महिला रुग्णालयासाठी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Waive the lease of 500 hectares of capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.