शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:29 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा कारभार कागदावरच : खत खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकºयांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.चौरास भागात पाणी असले तरी आजही अनेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात.त्यामुळे निसर्गाच्या कृपेवरच शेतकरी अवलंबून आहे.परिसरात अजून दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत.काही ठिकाणी सिंचन सुविधा असणारे शेतकरी पऱ्हे टाकण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. कोरडवाहू शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दररोज आकाशात ढग गोळा होतात पण पाऊस मात्र पडत नाही. सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे शेतशिवारात काडीकचरा जमा करणे, धुरे पेटविणे यासारखी कामे शेतकरी सकाळच्या वेळेत करतानाचे चित्र दिसत आहे.बैलजोड्यांची संख्या घटल्याने शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. कोंढा परिसरात गेल्या तीन वर्षापासुन कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाने दगा दिल्याने धान उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतीव्यवसाय परवडत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम पूर्व सभा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असताना कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हा, तालुक्याच्या वरीष्ट अधिकाºयांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.पीक कर्जासाठी लगबगकोंढा परिसरात शेतकरी शेती हंगामासाठी पैशाची जमवाजमव करताना दिसून येत आहे. विविध सेवा सहकारी संस्था, तसेच सहकारी बँक व बँक आॅफ इंडियासह ईतर बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जासाठी प्रथम प्राधान्य सेवा सहकारी संस्थेला आहे.कारण येथे शेतकºयांना वर्षाकाठी फक्त मुद्दलच जमा करावे लागते. ईतर बँकेतव्याजसहीत मुद्दल जमा करावे लागते. कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करतात. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ न केल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्ल प्रचंड नाराजी आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.खते, बियाण्यांच्या किंमती वधारल्याबियाण्यांच्या किंमतीत दरवर्षीच वाढ होत आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आपल्याला कमी किंमतीत कोणते बियाणे मिळेल याच्या शोधात असतो. कोंढा परिसरात बोगस बियाणे, किटकनाशकांची छुप्या पद्धतीने विक्री सुरु असल्याची चर्चा आहे.यावर आळा घालण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.परंतु तसे होताना दिसत नाही.अनेक कृषीकेंद्र धारक पक्की बिले देत नसतानादेखील कृषि अधिकारी डोळेझाक करताना दिसून येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी