शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील धरणग्रस्तांची मेंढा पुनर्वसनला भेट

By admin | Updated: November 25, 2014 22:51 IST

पूर्ण भारतातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणाला व मेंढा पुनर्वसन गावाला भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या

गोसेबुज : पूर्ण भारतातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणाला व मेंढा पुनर्वसन गावाला भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या कामाला आलेली गती, आंदोलने व पुनर्वसन पॅकेज वाटपाची माहिती जाणून घेतली. हे प्रतिनिधी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, तामिळनाडू, ओडीसा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, महाराष्ट्र आदी राज्यातून आले होते.या प्रतिनिधींनी गोसीखुर्द धरणाला भेट देवून धरणाच्या प्रगती विषयी माहिती जाणून घेतल्यानंतर मेंढा पुनर्वसन येथे आगमन होताच गावकऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. सुरवातीला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत तागडे यांनी गोसीखर्दु धरणाची प्रगती व प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण आंदोलनाची विस्तृत माहिती या प्रतिनिधींना दिली. संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे झालेले फायदे, अडचणी विषयी माहिती देवून प्रकल्पग्रस्तांच्या पुढेही होणाऱ्या आंदोलनावर प्रकाश टाकला. राजस्थानचे खेमराज भाई, तामीलनाडूचे सेल्वराज, आंध्रप्रदेशचे सतदेवा, बिहारचे संतोष उपाध्याय व कैलाश भारती, झारखंडचे अरविंद अंजूम, मध्यप्रदेश राज्यातील अमित भाई व रायगडच्या उल्का महाजन यांनी प्रकल्पग्रस्तांना प्रश्न विचारून संपूर्ण माहिती जाणून घेतली. स्थानिक प्रकल्पग्रस्त माजी उपसरपंच दादा आगरे, प्रल्हाद मेश्राम, देवराम आगरे, पोर्णिमा कांबळे आदींनी या प्रतिनिधींना माहिती दिली. याप्रसंगी प्रकाश मेश्राम, गुला मेश्राम, गणेश आगरे, हरी आगरे, मंगरू मेश्राम, झिबल गणवीर, समीक्षा गणवीर, गौतम मेश्राम, ढेकल मेश्राम, वच्छला शेंडे, दिपक आगरे, सुनिता आगरे, सपना आगरे, प्रमिला तागडे, अविनाश कांबळे, सचिन कांबळे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)