शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजनेसाठी गावकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत. गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे.

ठळक मुद्देधनेगावचे प्रकरण : ३५ लाखांच्या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील धनेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ३५ लाख रूपयांचा नळ योजनेच्या कामात अनियमीतता होत असल्याच्या अरोप करीत गावकरी कंत्राटदाराविरोधात एकवटले आहे. गावात कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली तरी अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम केले नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
धनेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामात अनियमितता झाल्याने २६ जानेवारीची ग्रामसभा वादळी ठरली. गावकऱ्यांनी सरपंचाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाकडून या कामाची दखल घेण्यात आली. मात्र तरीही २६ जानेवारीच्या ग्रामसभेत नळयोजनेचा विषय गावकऱ्यांनी उचलून धरला.
सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत.
गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोरवेलमधील पाणी हे पिण्यासाठी शुद्ध नसल्याने पाणी फिल्टर करणे गरजेचे आहे. बोरवेलमधून उपसा करणाऱ्या मोटरपंप किती एचपीचे आहे याची साधी पुसटची कल्पनादेखील ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलेली नाही.
गावात वस्ती असताना नळयोजनेचे काम चांगले दर्जेदार पद्धतीने होणे गरजेचे होते. असे असताना कंत्राटदाराकडून गावाबाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर कोणतीही वस्ती नसताना पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आले आहे. अर्धवट कामे करून कंत्राटदार सदर योजनेतून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
पेयजल योजना ही ग्रामवकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असली तरी कंत्राटदार अर्धवट कामे करून फक्त निधी उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांत सुरु आहे. त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
ग्रामसभेत एकमताने सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून पुन्हा एकदा नवीन कंत्राटदाराकडून नळ योजनेचे काम करण्यासाठी गावकरी ठाम आहेत. कंत्राटदाराचे कंत्राट त्वरीत रद्द न केल्यास माजी सरपंच छगनलाल पारधी यांच्या नेतृत्वात उपोषण करण्याचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत नसून गावकऱ्यांशी मुजोरी करीत असल्याने गावकरी कंत्राटदाराविरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव घेणार आहेत.

टॅग्स :Waterपाणी