शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:12 IST

उत्थान आणि उन्नतीसाठी समाजाला सिंचन करायला दोन डॉक्टरांनी शिकविले. डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मात्र आज समाजात वेगळे विचार पेरून वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्देभंडारा व तुमसर येथे आयोजन : पथसंचलनाने वेधले लक्ष, योग, दंड यांचे चित्तथरारक प्रात्याक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्थान आणि उन्नतीसाठी समाजाला सिंचन करायला दोन डॉक्टरांनी शिकविले. डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मात्र आज समाजात वेगळे विचार पेरून वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यासर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजात समरसतेचा भाव निर्माण व्हायला हवा. हा भाव जागृत करण्याचे काम संघाची शाखा करीत असल्याचे मत रा. स्व. संघाचे प्रांत सह महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख प्रा. विजय राठोड यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव आज २१ आॅक्टोबर रोजी येथील दसरा मैदानात घेण्यात आला. यावेळी प्रा. राठोड प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख अतिथभ अर्जुन पोलीस अ‍ॅकेडमीचे संचालक रामचंद्र आगासे, जिल्हा संघ चालक रामभाऊ चाचेरे, नगर संघचालक अनिल मेहर उपस्थित होते. स्वयंसेवकांनी योग, दंड यांचे प्रात्याक्षिक प्रारंभी मान्यवरांसमोर करून दाखविले. वैयक्तिक गीत, सुभाषित आणि अमृतवचन झाले. पाहुण्यांचा परिचय नगर कार्यवाह रामकृष्ण बिसने यांनी करून दिला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रामचंद्र आगासे यांनी एखादी संघटना अविरतपणे नव्वद वर्ष आपले काम करीत असेल तर हे त्या संघटनेचे यश असल्याचे सांगितले. संस्कृती जतनाचे काम करणारा संघ भारताला परमवैभवावर नेण्याची क्षमता ठेवतो, असे सांगून संघातून मिळणारे संस्कारच समाजाची खरी ताकत असल्याचे यावेळी आगासे यांनी सांगितले.आपल्या प्रमुख उद्बोधनात विजय राठोड यांनी संघ म्हणजे समाज व्यवस्थेचे चिंतन करणारी अनुभूती देणारे केंद्र असल्याचे स्पष्ट केले. समाज जातीपाती, धर्मात विभाग जातो म्हणून ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून संघटीत होण्याचा संदेश दिला, तेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या माध्यमातून डॉ. हेडगेवारांनी केले. अखंड समाज निर्मितीचे स्वप्न संघाचे असून समाज सहभागातून हे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. संघाचे कार्य हे ईश्वरीय कार्य असून चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज महापुरूष ही विविध जाती, धर्म, पंथात विभागले जात आहेत. समाजाच्या अखंडता आणि एकतेला हे बाधक असून समरसतेचा भाव समाजात निर्माण होणे महत्वाचे असल्याचे सांगताना संघ शाखा हे भाव समाजात रूजविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.उत्सव सुरू होण्यापूर्वी भंडारा नगरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले होते. मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांकडून पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उत्सवाला अनेक लोकप्रतिनिधी यांच्यासह नगरातील मान्यवर महिला, पुरूष मंडळी उपस्थित होते.श्री जया उस्ताद गंज अखाडा व लायंस क्लब तुमसरचा उपक्रमतुमसर : श्री जया उस्ताद गंज अखाडा शारिरीक शिक्षण मंडळ तुमसर व लायंस क्लब तुमसरला लितमच्या संयुक्त विधमानाने दसरा उत्सव, शस्त्र पूजन व सत्कार कार्यक्रम परमानंद पपुलवार, अध्यक्ष लायंस क्लब लालितम यांच्या अध्यक्षते खाली सत्कारमुर्ती मधुकर कुकडे संस्था अध्यक्ष/ खासदार भंडारा - गोंदिया व प्रमुख पाहुणे विक्रम साळी उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, कटरे माजी सैनिक यांचा उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष, सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफल देवून संस्था सचिव घनश्याम बडवाईक व उपाध्यक्ष शालिकराम गौरकर यांनी सत्कार केले. कार्यक्रमाला उपस्थित संस्था पूर्व अध्यक्ष मारोती लाटकर, तुलशिराम कुकडे, देवचंद निखाड़े, अशोक कुकडे, राजकुमार माटे, सीताराम जोशी, किशोर चौधरी, संजय केवट, गोपी बडवाईक, राजधर मलेवार, अनिल लाटकर, रोशन पिकलमुंडे, तुषार मलेवार, वासुदेव आगाशे, सचिन बडवाईक, कार्यक्रमाचे संचालन संस्था कोषाध्यक्ष गजानन लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्था सचिव बडवाईक यांनी केले.