शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातल्या भाज्या निघाल्या सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:56 IST

भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे पाठबळ हरदोलीची भेंडी, मिरची दुबई-कतारला

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकरी निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन घेण्याकडे वळत आहे.भंडारा जिल्हा म्हणजे भात उत्पादन असे समीकरण झाले आहे. मात्र अलीकडे भात शेती परवडत नसल्याने शेतकरी विविध प्रयोग करीत आहे. त्यातच गत काही वर्षात पालेभाज्या उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. गुणवत्तापुर्ण पालेभाज्यांना स्थानिक बाजारातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील सेवकराम झंझाड यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला आता सातासमुद्रापार दुबई, कतार येथे निर्यात केला जात आहे.सेवकराम झंझाड यांच्याकडे सहा एकर शेती असून या शेतीत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नागपूर येथे ‘वनामती’मध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून खऱ्या अर्थाने निर्यातक्षम पालेभाजा उत्पादनाला सुरवात झाली. निर्यातक्षम उत्पादन घेवून त्यांनी प्रगतीचा नवा मार्ग चोखाळला आहे. नागपूर येथील मित्राय फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला दुबई-कतार येथे निर्यात केला जात आहे. त्यातून त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक नफा मिळत आहे. भेंडीला स्थानिक बाजारात १५ ते १६ रुपये किलो दर मिळतो. तोच आता निर्यातीमुळे २४ रुपये किलो मिळत आहे. मिरचीतही त्यांना चांगलाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम उत्पादन घेतल्यास प्रगती करणे सहज शक्य असल्याचे सेवक झंझाड सांगतात.भेंडी उत्पादनातून चार लाख ७५ हजार नफासेवक झंझाड यांनी आपल्या शेतात मलचिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर दोन एकरामध्ये भेंडी आणि चार एकरात मिरचीची लागवड केली होती. चार महिन्यात भेंडीचे १९ टन ७७८ किलो उत्पादन झाले. त्यातून खर्च वजा जाता चार लाख ७४ हजार रुपये निव्वळ नफा झाला. मिरचीच्या दोन तोडणीतून दोन लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सेवक झंझाड सांगतात.जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाल्याची लागवड करण्याची गरज आहे. मलचिंग व ठिबक सिंचनाचा वापर करुन भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविता येते. कृषी विभागातील प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होतो.- मिलींद लाडउपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :vegetableभाज्या