शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचाही परिणाम : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिवाळाच्या सुरुवातीलाच भाज्यांचे दर सर्वत्र गगणाला भिडले आहेत. भाजीमार्केटमध्ये मेथी, वांगे, टोमॅटो, कोबी, हिरव्या मिरची अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले असल्याने सर्व सामान्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे.हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. मेथी ८० ते १०० रुपये किलो, टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो तसेच वांगे ६० रुपये, पालक २५ रुपये जुडी, हिरवी मिरची ४० रुपये किलो दराने मिळत असल्याने अनेकांना भाजीपाला खरेदी करणे मुश्कीलीचे होत आहे. त्यातच गृहिणींना आपले बजेट सांभाळतांना कसरत करावी लागत आहे.यावर्षी जुन, जुलै महिना वगळता सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाने सातत्य राखल्याने अनेक ठिकाणी भाजीपाला पिके जागेवरच उद्ध्वस्त झाली. पावसाचे प्रमाण प्रचंड होते. याचा खरीप हंगामाला फटका बसला. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर यावर्षी कायम गगणाला भिडलेले दिसून येत आहे.जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचल्याने जागेवरच पिके सडली. तर काही ठिकाणी पावसामुळे मातीतच गाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाचे अपेक्षीत उत्पन्न मिळाले नाही. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर सातत्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी नागपूरवरुन जिल्ह्यात आयात केला जाणारा भाजीपाला ग्राहकांना चढत्यादराने खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. शिवाय ताजा भाजीपाला मिळणेही दुरापास्त होत आहे.दिवाळीनंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून शेतकरी स्वत:च्या शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. परंतु यावर्षी मात्र हे चित्र दिसून येत नाही. भाजीपाला पिकांसोबतच अनेक शेतकरी लौकी, तुरीच्या शेंगा, सिताफळे, आवळा आदी विविध फळे विक्रीसाठी आणत असतात. परंतु यावर्षी मात्र भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे दारावर येऊन विक्री करणाºया भाजीपाला विक्रेत्यांची संख्यादेखील रोडावली आहे.बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. हिवाळा आला की, मेथी, पालक, चवळी या पालेभाज्यांना मोठी मागणी वाढत असते. भंडारातील भाजीबाजारात कारले, भोपळा, हिरवी मिरची आदी भाज्यांची मागणी जास्तीच्या दराने होत आहे. मोठा बाजार परिसरात शहराच्या जवळील सुरेवाडा, खमारी, खरबी, परसोडी, आंबाडी, सिल्ली, कारधा या विविध गावातून भाजीपाल्यांची आवक होत नसल्याचे चित्र आहे. गत वर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये सर्व भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो प्रमाणे होते. मात्र यावर्षी सर्वच भाज्यांचे दर किमान ६० ते ८० रुपये किलोच्या आसपास आहेत. अनेक विक्रेत्यांनी स्थानिक भाजीपाल्याची कमी झाल्याने दर वाढल्याचे सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्या