शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वनविकास महामंडाळाच्या आगारात कर्मचाऱ्यांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

फायद्यात असलेले महामंडळाचे स्थानिक गडेगाव येथील आगाराकडे दुर्लक्ष आहे. कर्मचाऱ्यांना वास्तव्य करण्यासाठी निवासस्थान नाही. परिणामी वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी येथे राहत नाही. आगारात लाखोंची वनसंपत्ती आहे. एफडीसीएम रोपवन निर्मितीत अग्रसेर आहे. वनसंरक्षण, बीज संकलन व अन्य प्रकल्पातून कामाला उत्तम दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न वन मजूरांमार्फत केला जातो.

ठळक मुद्देगडेगाव येथील आगार : वनक्षेत्राकडे दुर्लक्ष, परिसराची झाली भकास अवस्था

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कंपनी कायद्याखाली येत असलेल्या वनविकास महामंडळ महाराष्ट्र (एफडीसीएम)च्या गडेगाव येथील लाकूड आगारात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. एफडीसीएम कार्यालयाच्या कारभार या आगारातून चालत असतो. लोकमत प्रतिनिधीने ऑन द स्पॉट पाहणी केली असता या आगारात वनपरिक्षेत्राधिकारी व इतर कर्मचारी आढळून आले नाही. एकंदरीत या परिसराची अवस्था भकास झाली असून वनक्षेत्राकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे जाणवते.१६ फेब्रुवारी १९७४ ला एफडीसीएमची निर्मिती करण्यात आली. राज्यातील एकूण वनक्षेत्राच्या ६ टक्के वन भाडेतत्वावर देण्यात आले. पुर्वी २४ ते ३० हेक्टर वनक्षेत्र एफडीसीएमकडे होते. मात्र वनविभागाने वनक्षेत्र परत मागितले आहे. कोका-करडी व नविन नागझिरा अभयारण्य यामुळे एफडीसीएमचे वनक्षेत्र कमी झाले आहे. आठ हजार हेक्टर वनक्षेत्र महामंडळाकडे आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर वनक्षेत्र बफरझोन आहे.गत २५ वर्षांपासून वनविकास महामंडळ फायद्यात आहे. पाच वर्षांपासून शासनाला लाभांष देण्यात येत आहे. परंतु फायद्यात असलेले महामंडळाचे स्थानिक गडेगाव येथील आगाराकडे दुर्लक्ष आहे. कर्मचाऱ्यांना वास्तव्य करण्यासाठी निवासस्थान नाही. परिणामी वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी येथे राहत नाही. आगारात लाखोंची वनसंपत्ती आहे. एफडीसीएम रोपवन निर्मितीत अग्रसेर आहे. वनसंरक्षण, बीज संकलन व अन्य प्रकल्पातून कामाला उत्तम दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न वन मजूरांमार्फत केला जातो. तरीही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आगाराचा विकास झालेला नाही. पुरकाबोडी, किटाडी, बरडकिन्ही येथे एफडीसीएमचे वनक्षेत्र आहे. दरवर्षी वनव्यात लाखोंची वनसंपदा नष्ट होते. उमरझरी, सोनेगाव येथे कार्यालय असले तरी तिथेही वनांची काळजी घेतली जात नाही.गडेगाव आगारात वनमजुरांच्या भरोशावर कामकाज चालविले जाते. ४० एकर क्षेत्रात असलेल्या लाकूड आगाराची जबाबदारी केवळ एका वनमजूरावर असते.

 

टॅग्स :forestजंगल