मऱ्हेगाव संस्थेची बिनविरोध निवडणूक
By Admin | Updated: March 8, 2015 00:26 IST2015-03-08T00:26:08+5:302015-03-08T00:26:08+5:30
जवळील मऱ्हेगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. मात्र अध्यक्षपदाकरिता दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मऱ्हेगाव संस्थेची बिनविरोध निवडणूक
पालांदूर : जवळील मऱ्हेगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. मात्र अध्यक्षपदाकरिता दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी सरपंचांनी मध्यस्थी केली.
दूरदृष्टी ठेवून गाव विकासाला चालना मिळावी. नाहक निवडणूक घेऊन पैशाची उधळपट्टी थांबवावी याकरिता गावच्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेत सर्वांच्या सहमतीतून सेवा सह. संस्थेची निवडणूक बिना निवडणुकीने पार पडली.
१३ सदस्यांची निवड शांततेतून पार पडली. १३ उमेदवारातून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडायचे होते. यात गावातील असंतुष्ट लोकांनी चढवाचढवीचे राजकारण केले. त्यामुळे बैठकीत ठरलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष अडचणीत आले.
मात्र सरपंच श्यामराव बेंदवार यांनी गावाला दिलेला शब्द खरा करण्याकरिता प्रतिष्ठा पणाला लावत ठरलेलाच उमेदवाराला निवडून आून गावाची प्रतिष्ठा कायम ठेवली.
यात अध्यक्षपदी चंद्रभान मोतीराम बेंदवार, उपाध्यक्ष देवराम फुलुक्के, सदस्य सुरेश राऊत, गोपाल कांबळे, यशवंत राऊत, कमला चिचमलकर, कैलाश ब्राह्मणकर, वासुदेव सिंग, संतोष ब्राह्मणकर, आनंदराव ब्राह्मणकर, रंभा ब्राह्मणकर, हरिदास तरोणे, देवराम मेश्राम अशी कमेटी तयार झाली. निवडणूक अधिकारी भांडारकर, सचिव सुनिल कापसे, शिपाई देवराम तलमले यांनी शांततेत निवडणूक पार पाडली. सरपंच शामराव बेंदवार गटाने गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)