कारच्या धडकेत अनोळखी महिला ठार, चालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 17:30 IST2021-11-22T17:25:38+5:302021-11-22T17:30:35+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव (सडक) परिसरातील मिलन धाब्यासमोर कारने अनोळखी महिलेला धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. मृत महिलेची ओळख अजूनही पटलेली नाही.

कारच्या धडकेत अनोळखी महिला ठार, चालक अटकेत
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव (सडक) परिसरातील मिलन धाब्यासमोर कारने अनोळखी महिलेला धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. मृत महिलेची ओळख अजूनही पटलेली नाही.
ही महिला कुठून आली, कोण आहे, कुठे जात होती याची माहिती नाही. मृत पावलेल्या महिलेचा वर्ण गोरा असून उंची ४ फूट ८ इंच व मध्यम बांधा आहे. अंगात पांढरा ब्लाऊज व निळ्या रंगाची सोनेरी ठिपके असलेली साडी, कानात पिवळ्या धातूचे डूल, दोन्ही हातात मेहंदी लावलेली असून पिवळ्या धातूचे कंगण आहे. यासंदर्भात कुणाला माहिती असल्यास लाखनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक मनोज वाडिवे, साहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांनी कळविले आहे.
लाखनी पोलिसांनी पोलीस नायक लोकेश ढोक यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) भांदवि सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर करीत आहेत. कारचालकाला लाखनी पोलिसांनी अटक केली आहे.