मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:47+5:30

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. आता तर स्मशानभूमीत जागाही अपुरी पडू लागली. लगतचा परिसरही स्मशानभूमीसाठी घेण्यात आला.

The unfortunate time of putting up a cheetah before death | मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ

मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ

ठळक मुद्देकाेविड स्मशानभूमी : दरराेज २० ते २५ अंत्यसंस्कारसाठी दाेन ट्रक लागतात लाकडे

ज्ञानेश्वर मुंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र काेराेनाचे मृत्युतांडव पाषाणहृदयी व्यक्तीलाही पाझर फाेडणारे आहे. दरराेज कुणाची ना कुणाची मृत्यूची वार्ता कानी पडते. काळजात चर्रर्र हाेते. सर्वसामान्यांची ही अवस्था तर काेविड स्मशानभूमीत गत वर्षभरापासून ६००वर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचे काय? भंडारा येथील काेविड स्मशानभूमीत दरराेज २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. गत काही दिवसांत मृत्यूची संख्या वाढल्याने ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जात आहे. काेराेनाने मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ माणसांवर आणली आहे.
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. आता तर स्मशानभूमीत जागाही अपुरी पडू लागली. लगतचा परिसरही स्मशानभूमीसाठी घेण्यात आला. सुरुवातीला बांधलेले चाैदा ओटे कमी पडू लागल्याने आता थेट जमिनीवरच सरण रचले जाते. 
एकीकडे चिता धगधगत असताना दुसरीकडे सरणही रचले जाते. ऐनवेळी गाेंधळ उडू नये, कुणाला अंत्यसंस्कारासाठी फार वेळ ताटकळत राहू नये यासाठी आता ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जाते.
गिराेलाच्या स्मशानभूमीत एका रांगेत रचून ठेवलेले सरण काेराेनाच्या भीषणतेची साक्ष देते. दरराेज दाेन ते तीन ट्रक लाकडे आणून स्मशानभूमीत ठेवली जातात. लाकडांचा खच कुणाच्याही काळजाचे पाणीपाणी केल्याशिवाय राहत नाही. अशा भीषण परिस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अहाेरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.
ट्रकमधून लाकडे काढण्यापासून चिता रचण्यापर्यंत आणि कुणी नातेवाईक पुढे आले नाही तर भडाग्नी देईपर्यंत त्यांना साेपस्कार पार पाडावे लागतात. पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना या कर्मचाऱ्यांची काय अवस्था हाेत असेल आणि दरराेज मृत्यूचे तांडव अनुभवताना त्यांच्या मानसिकतेचे काय, असाही प्रश्न निर्माण हाेताे. 
काेविड स्मशानभूमीत अभियंता प्रशांत गणवीर, मुकादम, रक्षित दहिवले, सीताराम बांते, जशपाल साेनेकर, संदीप हुमणे, राकेश वासनिक यांच्यासह राहुल देशमुख, संग्राम कटकवार, मुकेश शेंद्रे, मुकेश झाडे, दिनेश भावसार आदी नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना मृतांवर अंत्यसंस्कारासह सर्व साेपस्कार पार पाडतात. अशा कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी काेराेनाग्रस्तांवर आपलेपणाने अंत्यसंस्कार करतात. 

धगधगत्या चिता सांगतात काेराेनाचे भीषण वास्तव
 काेविड स्मशानभूमी राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला या काेविड स्मशानभूमीतील धगधगत्या चिता दिसतात. काेराेनाचे काय वास्तव आहे हे या स्मशानभूमीत दिसते. गत काही दिवसांपासून तर स्मशानातील चितांची धग कमी झाली नाही उलट आता ॲडव्हान्समध्ये चिता रचून ठेवण्याची वेळ आली. काेराेना संसर्गातही बाहेर फिरून नियमाचा भंग करणाऱ्यांनी एकदा गिराेलाच्या स्मशानभूमीचे बाहेरून तरी स्मशानभूमीचे वास्तव अनुभवावे एवढीच माफक अपेक्षा.

 

Web Title: The unfortunate time of putting up a cheetah before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.