शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नरेगांतर्गत ८८५ विहिरींची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:12 IST

जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी नरेगाअंतर्गत बोअरवेलसह विंधन विहिरींचे बांधकाम करण्यात येते.

ठळक मुद्देधडक सिंचन विहीर योजना : उद्दिष्ट गाठणार काय?

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी नरेगाअंतर्गत बोअरवेलसह विंधन विहिरींचे बांधकाम करण्यात येते. मात्र जिल्ह्यात ८८५ विहिरींची कामे अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी सदर कामे पूर्ण करण्याचे सुचना दिल्या आहेत.धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत (नरेगा) भंडारा जिल्ह्यातील एकूण ४०८३ (एमआयएस)विहिरींचे बांधकाम करायचे आहे. त्यापैकी २५५१ सिंचन विहिरींचे बांधकाम झाले आहे. प्रत्यक्षात मात्र तांत्रिक बाबींमुळे सद्यस्थितीत सातही तालुक्यातील ८८५ विहिरींचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहेत. सदर कामे उन्हाळयापूर्वी होणार काय असा सवाल आहे.विदभार्तील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २००६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकºयांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली.तसेच धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण आणि प्रगतीपथावरील सिंचन विहिरी वगळता शिल्लक असलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अनियमित, अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकºयांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत करण्यात येते.नागपूर विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात भूगर्भात पाण्याची अधिक उपलब्धता असूनही विहिरींची संख्या कमी असल्याने सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची खंत नेहमी व्यक्त केली जाते. उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता या ठिकाणी शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात विहिरी घेण्यात याव्यात, असे शासनाचे निर्देशही आहेत.नरेगांतर्गत ८८५ विहिरींपैकी ६३६ विहिरींच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसारच कामे सुरू आहेत.-मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारीरोहयो तथा पुनर्वसन विभाग, भंडारा