दुचाकी नालीत कोसळून दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:47+5:30

शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश कामथे आणि राकेश देशमुख यांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आले. या घटनेची रेंगेपार येथे माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Two young men killed when their two-wheeler fell into a ditch | दुचाकी नालीत कोसळून दोन तरुण ठार

दुचाकी नालीत कोसळून दोन तरुण ठार

लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : भाऊबिजेची ओवाळणी करुन बहिणीच्या घरुन गावी परतताना दुचाकी रस्त्यालगतच्या नालीत पडून दोन तरुण ठार झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी येथे शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. जखमी अवस्थेत रात्रभर दोघेही नालीत पडून राहिल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. महेश जगदीश कामथे (३२) व राकेश केवळराम देशमुख (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी हे दोघे महेश कामथे यांच्या बहिणीकडे शिवणीबांध येथे गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी झाल्यानंतर दुचाकी क्रमांक एमएच ३६ सी ४८९२ ने ते सायंकाळी ६ वाजता भूगावमार्गे रेंगेपारकडे येत होते. नानोरा ते माेगरा मार्गावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन पडले. विशेष म्हणजे ही नाली पाण्याने तुडूंब भरलेली होती.
शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश कामथे आणि राकेश देशमुख यांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आले. या घटनेची रेंगेपार येथे माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. रात्रीच्या वेळी परत येत असताना ते दोघेही तरुण नालीत पडले. परंतु अंधारामुळे हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. रात्रभर नालीतच पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
- लाखनी पोलिसांनी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. लाखनी येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यावेळी घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. सायंकाळी या दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेश देशमुख हा अविवाहित होता. तर महेश याचा चार वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याला आठ दिवसाचा मुलगा आहे.

अपघात नेमका झाला कसा
- भूगावमार्गे रेंगेपार कडे येत असताना नानोरा मोगरा गावाजवळील नाल्यात महेश आणि राकेश कोसळून मृत्युमुखी पडले. त्यांच्या दुचाकीला धडक दिली असावी. त्यामुळे दुचाकी अनियंत्रीत होऊन नालीत पडली असावी किंवा एखादे जनावरे आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी नालीत पडली असावी असा अंदाज आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कोरचे करीत आहेत.

 

Web Title: Two young men killed when their two-wheeler fell into a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.