Two-wheeler runs out of fuel | दुचाकीचे पेट्राेल संपले अन् चाेरट्या जाळ्यात अडकला!

दुचाकीचे पेट्राेल संपले अन् चाेरट्या जाळ्यात अडकला!

भिलेवाडा येथील साहिल राजू पुडके (१७) हा कारधा येथील शंकरराव काळे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ताे गुरुवारी महाविद्यालयात गेला. आपली दुचाकी त्याने पार्किंगमध्ये उभी केली. क्लास आटाेपून परत आला तेव्हा दुचाकी दिसली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाेलीस ठाण्यात रिपाेर्ट देण्यासाठी जात हाेता. त्या वेळी अचानक एक इसम पेट्राेल संपल्याने दुचाकी ढकलत रस्त्याने जात असल्याचे दिसून आले. साहिलने ही आपली दुचाकी असल्याचे ओळखले. याबाबत त्या इसमाला विचारले असता त्याने अडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर चाेरीचा प्रकार उघडकीस आला असता ताे पळून जायला लागला. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर लाेकांनी त्याला पकडून कारधा पाेलिसांच्या हवाली केले. महेंद्र चुन्नीलाल बाेंबचरे (३५, रा. बाेनकटा जि. बालाघाटा मध्य प्रदेश) असे आराेपीचे नाव आहे. त्याला कारधा पाेलिसांनी अटक केली.

Web Title: Two-wheeler runs out of fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.