मालवाहू वाहनाची ऑटोरिक्षासह दोन दुचाकींना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:33 AM2021-03-06T04:33:37+5:302021-03-06T04:33:37+5:30

लाखांदूर येथून काही प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटोरिक्षा (क्र. एम.एच. ३६/३४४०) चप्राड येथील बसस्थानकावर प्रवाशांना उतरवीत होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने ...

A two-wheeler with an autorickshaw of a cargo vehicle collided | मालवाहू वाहनाची ऑटोरिक्षासह दोन दुचाकींना धडक

मालवाहू वाहनाची ऑटोरिक्षासह दोन दुचाकींना धडक

Next

लाखांदूर येथून काही प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटोरिक्षा (क्र. एम.एच. ३६/३४४०) चप्राड येथील बसस्थानकावर प्रवाशांना उतरवीत होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने म्हशींना वाहनात कोंबून भरधाव वेगाने बोलेरो मालवाहू वाहनाने (क्र. एम.एच. ३६ ए.ए. १३०५) ने उभ्या ऑटोरिक्षाला धडक देत पळ काढला. काही अंतरावर दोन दुचाकींना धडक दिली. या दोन्ही धडकेत ११ प्रवासी जखमी झाले.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांसह पोलिसांना होताच घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अपघातात १० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. तर एक महिला गंभीर असल्याने येथील रुग्णालयात उपचारार्थ असल्याची माहिती आहे.

या अपघातात हना कुंभरे (६७), रेवता कुंभरे (६) रा. पिंपळगाव, नीना नाकतोडे (३५) रा. मान्देड, आबाजी वकेकार (७०) रा. चिचोली, सिंधू मेश्राम (५०) रा. वैरागड जि. गडचिरोली, निर्मला टापरे (१८) रा. मेंढा, लिजा नाकतोडे (४) मान्देड, नारायण वकेकार (७१) रा. चिचोली, प्रमोद नाकतोडे (४५) रा. मान्देड, आलोक सरकार (२८) रा. गौरनगर हे किरकोळ तर नंदा टापरे (५०) रा. मेंढा ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: A two-wheeler with an autorickshaw of a cargo vehicle collided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.