शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

चारा पिकाखाली येणार दोन हजार हेक्टर क्षेत्र

By admin | Updated: February 16, 2015 00:38 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जनावरांसाठी चाऱ्याची समस्या भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जनावरांसाठी चाऱ्याची समस्या भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र चारा पिकाखाली आणणार आहे.धान उत्पादक जिल्हा असला तरी, अस्मानी संकट ओढवल्याने खरीप पीक होऊ शकले नाही. उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा प्रश्न भेडसावणार आहे. ही परिस्थिती राज्यात उद्भवणार आहे. भंडारा जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक असले तरी पावसाअभावी पीक करपली होती. त्यामुळे धानाचे उत्पादनही अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रबी पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, खरीप पीक हातचे गेले तर रबी पिकाची पेरणी मुदतीत झाली नाही. त्यामुळे रबीचे उत्पादनही घटनार आहे. धानापासून केवळ तणस उत्पादन झाले असून जिल्ह्यातील दुधाळ जनावरांचा आकडा बघता. दुधदुभत्या जनावरांसाठी उन्हाळ्यात हिरवा चारा आवश्यक आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होईल.ही परिस्थिती बघून पशुधन विकास विभागाने जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळावा, यासाठी वैरण विकास योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मका व ज्वारीचे बीयाणे मोफत वाटप करणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना जिल्ह्यात अंमलात आणण्याचे ठरविले आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र चारा पिकाखाली आणण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे.यासाठी कृषी विभागाने साकोली तालुक्यातील २०० हेक्टर तर भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्रात चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शेतकऱ्यांना मका प्रति हेक्टर २५ किलो तर ज्वारी प्रती हेक्टर २१ किलोचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकाऱ्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)