ट्रॅक्टर - दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 18:40 IST2023-04-29T18:39:37+5:302023-04-29T18:40:17+5:30
Bhandara News दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

ट्रॅक्टर - दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
देवानंद नंदेश्वर
भंडारा : दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना निलज काकेपार रस्त्यावर शुक्रवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.
मृतकांमध्ये मेंढेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भाष्कर भाऊराव मालोदे (४७) व संचालक कवडू अभिमन मालोदे (३७) दोघेही काकेपार येथील रहिवासी आहेत. पवनी येथील कामे आटोपून रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान स्वगावी काकेपार येथे परत जात असताना निलज काकेपार रस्त्यावर असलेल्या मोडीवर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात भास्कर मालोदे यांचा जागीच मृत्यू झाला. कवडू मालोदे याला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना ठाणा गावाजवळ मृत्यू झाला. घटनेची नोंद भिवापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.