शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर, साकोलीत लाडक्या बहिणींची मतदानात आघाडी, भंडाऱ्यातही बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:33 IST

पुरुष पिछाडीवर : सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलांचे सरासरी ६४.७८ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा :तुमसर आणि साकोली विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींनी मतदानात आघाडी घेतल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीनहीं विधानसभा मतदारसंघांतील महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६६.७१ टक्के होती, तर पुरुषांची टक्केवारी ६५.०२ टक्के होती. मतदानात आघाडी घेतली असली तरी मतपेटीतून या बहिणी कुणाची पाठराखण करणार, हे शनिवारी समोर येणारच आहे.

महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला, महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी या योजनेचा जोरदार प्रचार केला. 

एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी भंडाऱ्यातील सभेतही महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि ओवाळणी म्हणून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. नेत्यांच्या या आवाहनाला मतदानाच्या रूपाने मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी हे मतदान कुणाच्या पारड्यात जाणार, यावरून या लाडक्या बहिणींचा कौल दिसणार आहे. 

तुमसरच्या तुलनेत विचार करता साकोली मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी दोनने अधिक आहे. तिथे पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६६.०७, तर महिलांची ६८.३५ टक्के आहे. मात्र भंडारा मतदारसंघात महिला व पुरुषांची मतदानाची टक्केवारी जवळपास बरोबरीत आहे. 

बूथवरही महिलाच अधिकभंडारा शहरात लागलेल्या मतदानाच्या बूथवर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर महिला मतदार पहावयास मिळाल्या. यापूर्वी बुथवर बहुतांश पुरुष मतदारच असायचे, यावेळी ही जागा महिला आणि तरुणींनी घेतल्याचे दिसून आले. यावरून लाडक्या बहिणींचा उत्साहदेखील दिसून आला. 

पुरुषांपेक्षा १०,७०५ महिलांचे मतदान अधिकतीनही मतदारसंघांत एकूण मतदारांची संख्या १० लाख १६ हजार ८७० आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार यात ३ लाख २९ हजार ६२२ पुरुषांनी, तर ३ लाख ४० हजार ३२७ महिलांनी मतदान केले. पुरुषांपेक्षा १० हजार ७०५ अधिक महिलांनी मतदान केले आहे. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६५,०२, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६६.७४ इतकी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी ६५.८० नोंदविण्यात आली आहे.

तुमसरात भरगच्च प्रतिसाद महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद तुमसर मतदारसंघात आहे. तुमसरच्या तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघात सकाळपासूनच महिला मतदानाकरिता घराबाहेर पडल्या होत्या. तुमसर व मोहाडी या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात विशेषतः महिलांनी मतदानाकरिता केंद्रावर मोठी गर्दी केली होती, महिलांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्रावर दिसून आल्या. त्या तुलनेत पुरुष मतदान करण्याकरिता घराबाहेर निघण्याचे प्रमाण येथे कमी होते. त्यामुळे येथील निकाल आश्चर्यकारक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही,

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानtumsar-acतुमसरsakoli-acसाकोली