शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

तुमसर पोलिसांना पोलिसगिरी भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:08 AM

कोणताही गुन्हा दाखल नसताना व कोणताही दोष नसताना १४ जानेवारीच्या रात्री ८ वाजता तुमसर पोलिसांनी पोलिसगिरी दाखवत जबरदस्तीने घरात शिरून एका युवकास लाठयाकाठयाने मारहाण केली.

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : कोणताही गुन्हा दाखल नसताना व कोणताही दोष नसताना १४ जानेवारीच्या रात्री ८ वाजता तुमसर पोलिसांनी पोलिसगिरी दाखवत जबरदस्तीने घरात शिरून एका युवकास लाठयाकाठयाने मारहाण केली. व कुणालाही काहीही न सागंता गाडीत बसवून अपहरण केली, अशी तक्रार पीडित तरूणाच्या आईने पोलीस अधिक्षक व पोलीस महासंचालकाकडे केली आहे. या मारहाणीचे प्रकरण तुमसर पोलिसांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे.१४ जानेवारीला रात्री ८ वाजता अमित शामराव जगणे (२८) रा.तुमसर हा कुटूंबियासह घरी असताना तुमसर पोलीसचे ठाणेदार गजानन कंकाळे व त्यांची चमू जगणे यांच्या घराजवळ थांबली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा अर्विभात लाठ्याकाठ्या घेऊन पटापट उतरुन थेट घरात प्रवेश केला व कुणालाही काही न सांगता अमित जगणेला बेशुध्द होईस्तोवर मारहाण केले. त्याला गाडीत डांबून नेत असतांना पोलिसांना त्यांचे पालक विचारत राहिले. परंतु त्यांना काही न सांगता घेऊन गेले. थोड्या वेळानंतर कळले की विशाल गजभिये, शुभम बावने यांनाही पोलिसांनी उचलून नेल्याचे नागरिकांकडून कळले. ही बाब पसरताच नागरिक एकत्र येऊन पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यावेळी ते युवक बेशुध्द दिसून आले. दरम्यान मुलांचा गुन्हा कोणता? गुन्हा दाखल आहे का? ते दोषी आहेत का? आदी प्रश्न नागरिकांनी उपस्थित करताच पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र मुलाला ईतक्या क्रूरतेने मारताना पाहिलेल्या आई नंदा जगने हिला पाहावले नाही. अमित जगने हा अपराधी नाही. त्याने कधी कुणाचा खूनही केला नाही किंवा तो व्याभिचारी नाही. पोलिसांत कोणता गुन्हा दाखल नाही. दोष नसूनही पोलिसांनी घरात शिरुन कायद्याचे उल्लंघन करुन अमानुषपणे बेदम मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पिडीताची आई नंदा जगणे हिने महासंचालकांना करून तुमसर पोलिसांवर कारवाईची मागणी केलेली आहे.सदर तरूणांनी बाजार परिसरात व शहर वॉर्डात धुडगुस घालून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांविरूद्धची तक्रार अद्याप पोलीस ठाण्यात आलेली नाही.- गजानन कंकाळे,पोलीस निरीक्षक तुमसर.