ट्रक उलटला, वाहक जखमी, गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:59 IST2019-08-02T21:59:32+5:302019-08-02T21:59:51+5:30
तांदूळ भरलेला भरधाव ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा वाहक जखमी तर ट्रकखाली दबून एक गाय ठार झाली. ही घटना मोहाडी येथील पावर हाऊसजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ट्रक उलटला, वाहक जखमी, गाय ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तांदूळ भरलेला भरधाव ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा वाहक जखमी तर ट्रकखाली दबून एक गाय ठार झाली. ही घटना मोहाडी येथील पावर हाऊसजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
मोहाडी तालुक्यातील नेरी येथील तांदूळ भरून ट्रक गोंदियाकडे जात होता. पॉवर हाऊसजवळ चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्यावेळी तेथे बांधलेली गाय ट्रकखाली दबून जागीच ठार झाली. तर वाहकाचे दोन्ही पाय ट्रकमध्ये अडकले होते.
दोन तासाच्या प्रयत्नानंतर गॅस कटकरने टिनाचा पत्रा कापून त्याला बाहेर काढण्यात आले. मंगल मतारे असे त्याचे नाव आहे.
दुधाळू गाय ठार झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. अधिक तपास ठाणेदार निलेश वादले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गजन्नाथ गिरीपुंजे, मिथून चांदेवार करीत आहे.