आदिवासींनी एकत्र येऊन संस्कृती जपावी
By Admin | Updated: October 31, 2015 01:40 IST2015-10-31T01:40:50+5:302015-10-31T01:40:50+5:30
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक आदिवासीयांना विरमरण पत्करावे लागले. मात्र काळानुरूप आदिवासीयांचा बलीदान हा ईतिहास जमा झाला आहे.

आदिवासींनी एकत्र येऊन संस्कृती जपावी
शेडमाके शहीद दिन : राजे वासुदेवशहा यांचे प्रतिपादन
तुमसर : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक आदिवासीयांना विरमरण पत्करावे लागले. मात्र काळानुरूप आदिवासीयांचा बलीदान हा ईतिहास जमा झाला आहे. त्यांचा कुणीही वाली उरला नाही, अशी स्थिती उद्भवल्याने आता आदिवासीयांनीच पुढाकार घेवून व संघटीत होवून संस्कृतीचे जतन करीत समाजावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध लढा पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजे वासुदेवशहा यांनी केले.
विर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या १५ व्या शहिद दिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साहित्यिक मारोती उईके, आचार्य मोतीराव कंगाली, तहसिलदार सोनवाने, नायब तहसिलदार हरचिंद्र मडावी, बी.एस. सय्याम, आनंद मडावी, रविंद्र सलामे, नरेश आचले, कन्नाके, तलाठी मुल, डॉ. उईके, दिनेश इस्कापे, पिताराम उईके, राजकुमार परतेती, हरिष भलावी, ठाणेदार मनोज वाढीवे आदी मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम तालुक्यातील आंबागड येथील ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात मृत पावलेल्या आदिवासी बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोगस आदिवासीयांना नोकरीत संरक्षण देणारा २४ आॅक्टोंबर २००१ च्या शासन निर्णयाचा सामूहिक निषेध करण्यात आला. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येवून सर्वप्रथम नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे यांनी रक्तदान कार्यक्रमाची सुरूवात केली. दरम्यान ३५ आदिवासी बांधवांनी शिबिरात रक्तदान केले. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा व मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात आदिवासी संस्कृतीचे रंगारंग व सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आयोजन करून आदिवासी संस्कृतीला उजाळा दिला. प्रास्ताविक अशोक उईके यांनी केले. संचालन धनराज ईळपाचे, कैलास गजाम यांनी तर, आभार हरिशचंद्र सयाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्विकरिता विद्यार्थी संघाचे दिनेश मरस्कोल्हे कर्मचारी संघाचे मिताराम उईके, गोटुल समितीचे अविनाश धुर्वे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)