शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महामंडळाची धानखरेदी संशयास्पद

By admin | Updated: September 27, 2014 01:16 IST

महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे.

सौंदड : महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे. त्यांचे सब एजंट म्हणून जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था काम पाहतात. या संस्थांनी खरेदी केलेल्या खरीप हंगामातील धानाची पावसाळा सुरु होण्याअगोदर उचल करण्याची जबाबदारी आदिवासी महामंडळाची आहे. परंतू धान उचल करण्यासाठी चार महिन्यांचा दीर्घ अवधी मिळत असूनसुद्धा धानाची उचल वेळेवर करण्यात आलेली नाही. यात बराच घोळ असून व्यापाऱ्यांचे हित जोपासले जात असल्याचे दिसून येत आहे.धान खरेदीचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या संस्थांना दिले जाते व धान उचल करण्याची मंजूरी मिळाल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ हा व्यापाऱ्यांना धान विकते. व्यापारी हा धान वाहतुकीचे दर कमी असल्याचे कारण पुढे करून व परवडत नसल्याचे सांगून हा धान भरडाई करीत नाही. त्याऐवजी मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात वाहतुकीचे दर ४० रुपये असल्याने व्यापारी त्या राज्यातील धान उचलतो. त्यामुळे या आदिवासी महामंडळाचा सन २००८-०९ आणि २०१० या वर्षाचा खरेदी केलेला धान तब्बल तीन वर्षापर्यंत खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये व काही धान उघड्यावर पडून होता. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी व्यापाऱ्यांसोबत वाटाघाटी करुन या धानाचा निपटारा लावण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. अन्न व नागरी पुरवठामंत्री तसेच गोदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख असताना त्यांनीही आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष व आदिवासी विकासमंत्री मधूकर पिचड यांच्याशी तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याशी बातचित न करता त्याकडे दुर्लक्ष केले. आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपाध्यक्ष भात दुधनाग हे गोंदिया जिल्ह्याचे असताना त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे निव्वळ व्यापाऱ्यांच्या कायद्यासाठी हा सन २००८-०९-१० चा खरेदी केलेला धान सोडविला.गोंदिया जिल्हा हा दुर्गम व अतिदुर्गम भागात मोडतो. या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून एकाधिकार खरेदी म्हणून शासनाने एकाधिकार खरेदी योजनेतून जिल्ह्यातील आदिवासी भागाला वगळण्यात आले. आदिवासी विकास महामंडळातर्फे आदिवासी दुर्गम भागात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत धान खरेदी केला जाते. परंतु या खरेदी विक्री संस्थेपेक्षा येथील व्यापारी ३० ते ५० रुपये जास्त भाव देऊन धान खरेदी करतात. एकाधिकार खरेदी योजना सुरु असताना लिलाव पद्धतीने माल विक्री केला जात होता. तरीही नुकसान होत नव्हते. एकाधिकार योजना या भागात बंद झाल्याने सी.एम.आर. कस्टम मिलींग नुसार १६ मे च्या आधी धान भरडोई होत असे. सन २०१२-१३ मध्ये खरेदी केलेला धान भरडोईसाठी मे, जून, महिन्यामध्ये उचल करण्यात आला होता. परंतु सन २०१३-१४ चा धान अजूनही धान केंद्रावर पडून आहे. जर सन २००९-१० मध्ये ट्रान्सपोर्ट व भरडाईसाठी ६ कोटी रुपयांची तरतुद केली असती तर आज २०१३ पर्यंत आदिवासी विकास मंडळाचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले नसते.