शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले 'गोसीखुर्द'कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किंवा विदर्भातील अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, उमरेड-कऱ्हाडलाचे पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपवनी विदर्भाची काशी : वन्यजीव अभयारण्य आकर्षणाचे स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक, निसर्गरम्य, मनमोहक पर्यटन स्थळाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किंवा विदर्भातील अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, उमरेड-कऱ्हाडलाचे पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.पवनीपासून १२ किलोमिटर अंतरावर महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. सदर धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होत आहे पवनीनजिक रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघद्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तूपमधील सम्यक सम्बुध्दाची ४० फुट उंच मूर्ती शांत सभागृहात मनाला शांती देते. पवनी हे ऐतिहासीक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्याची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी वैभवशाली शहर म्हणून प्रसिध्द होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपुरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजुला टेकड्यावर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७० व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोट सदृष किल्ल्यामधून बंदुका, तोफामधून गोळया मारण्याचे छिद्रे आहेत. हा किल्ला आपली ऐतिहासीकतेची साक्ष देत आजही उभा आहे. शहरात अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची मूर्ती ही दहाव्या शतकातील असल्याचे मानले जाते. एका शिळास्तंभावर चारही बाजूने गणेशांच्या मुर्त्या कोरल्या आहेत. पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला कोरली आहे. नवनिर्मित उमरेड-करांडलाच्या पवनी वन्यजीव अभयारण्यामधील जंगल हे घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे येथे अनेक वन्यप्राणी व पक्षी मुक्तपणे फिरत असतात.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प