लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : साकोली तालुक्यातील आमगाव (बुज) येथील छाया सुधाकर मुंगमोडे (४३) या महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. आपल्या शेतामध्ये सरपण गोळा करत असताना ही घटना घडली. यात महिलेच्या मानेला व कानाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच, त्यांचा १७ वर्षीय मुलगा तन्मयने आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतल्याने छाया यांना सोडून पळून गेला.
ही घटना आमगाव (बु) येथील शेतशिवारात सकाळी १० वाजेदरम्यान घडली. छाया मुंगमोडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपुरात रेफर करण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले. मचाणही उभारले. मात्र, वाघ सापडलाच नाही. २८ तारखेच्या तीन घटनास्थळापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर ही तिसरी घटना घडली.
मुलाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण
छाया व १७ वर्षीय मुलगा तन्मय हे दुचाकीने शेतात गेले होते. शेतात पोहोचल्यावर तन्मय समोर चालत होता, तर त्याच्या काही अंतरावर मागे आई सरपण गोळा करीत होती. त्याच वेळेस वाघाने छाया यांच्यावर हल्ला केला.
आईवरील हल्ला लक्षात येताच तन्मयने जिवाची पर्वा न करता वाघासमोर येऊन किंचाळत, जोरात आरडाओरड करीत पळवून लावले. जखमी आईला दुचाकीवर बसवून घरी आणले व तिथून चारचाकीने दवाखान्यातही नेले. तन्मयच्या प्रसंगावधानाने छाया यांचा जीव वाचला.
Web Summary : In Sakoli, a tiger attacked a woman collecting firewood, causing serious injuries. Her son's quick thinking scared the tiger away, saving her life. She received initial treatment and was transferred to Nagpur.
Web Summary : साकोली में एक बाघ ने लकड़ियाँ बीन रही एक महिला पर हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई। उसके बेटे की तत्परता से बाघ डर गया, जिससे उसकी जान बच गई। उसे प्रारंभिक उपचार मिला और नागपुर स्थानांतरित कर दिया गया।