्न्नरामनामाच्या गजरात दुमदुमली भंडारानगरी
By Admin | Updated: April 16, 2016 00:20 IST2016-04-16T00:20:59+5:302016-04-16T00:20:59+5:30
‘अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीरामनवमीनिमित्त बहिरंगेश्वर मंदिरातून ...

्न्नरामनामाच्या गजरात दुमदुमली भंडारानगरी
चौकाचौकात महाप्रसाद, सरबतचे वितरण : प्रफुल पटेल, नाना पटोले शोभायात्रेत सहभागी
भंडारा : ‘अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीरामनवमीनिमित्त बहिरंगेश्वर मंदिरातून सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम शोभायात्रा धुमधडाक्यात काढण्यात आली.
या शोभायात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नाना पटोले, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अर्बन बँकेचे संचालक धनजंय दलाल, श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे, सचिव हेमंत आंबेकर यांच्यासह शहरातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
या शोभायात्रेतील विविध देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. रामजन्म ते रामसेतूपर्यंत प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारीत देखावे सुशोभित केलेल्या ट्रकवर तयार करण्यात आले होते. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गाक्रमण करणार असल्यामुळे चौकाचौकात महाप्रसाद आणि शरबतचे वितरण करण्यात आले. या मार्गावर नागरिकांची एकच गर्दी होती.
तत्पूर्वी आज शुक्रवारला सकाळी ७ वाजता शितलामाता मंदिरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता गुरूभक्त गणेशबुवा चेपे यांचा रामजन्म किर्तन कार्यक्रम पार पडला. रात्री उशिरा बहिरंगेश्वर मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. (जिल्हा प्रतिनिधी)