आमसभेत गदारोळ

By Admin | Updated: February 26, 2015 00:26 IST2015-02-26T00:26:08+5:302015-02-26T00:26:08+5:30

तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत शिक्षण लघु पाटबंधारे विभाग तथा विद्युत विभागासह सर्वच खात्यावर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह लोकप्रतिनिधींचा रोष दिसला.

Throng in the Aam Aadmi Party | आमसभेत गदारोळ

आमसभेत गदारोळ

तुमसर : तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत शिक्षण लघु पाटबंधारे विभाग तथा विद्युत विभागासह सर्वच खात्यावर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह लोकप्रतिनिधींचा रोष दिसला. शिक्षण विभागावर प्रश्नांचा भडीमार झाला. शालेय पोषण आहार व कामातील हयगय खपवून घेणार नसल्याचे आमदार वाघमारे यांनी आमसभेतून खडसावले.
लघु पाटबंधारे विभागाचा आढाव्यात सिंदपूरी येथील तलाव फूटून वर्षे लोटले तरी अजूनपर्यंत प्रगती झाली नाही असा प्रश्न सरपंचाने उपस्थित केला. दोन विभागात या तलावाची वाट अधिकाऱ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला. लघु पाटबंधारे विभाग जि.प. ० ते १०० हेक्टर पर्यंत सिंचनाचे तलाव जि.प. व १०० हेक्टर वर सिंचन होत असलेले तलाव लघू पाटबंधारे स्थानिक स्तर करतो.
१ कोटी ८२ लाख येथे खर्च अपेक्षित आहे अशी माहीती ल.पा. च्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली. गॉर्ज फिलींगला ४० ते ५० लाख खर्च अपेक्षित आहे. आ.चरण वाघमारे यांनी महत्वाची कामे त्वरीत झाली पाहीजे दोन विभागाचा फटका गावकऱ्यांना बसता कामा नये असे आदेश देऊन नविन प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारचे उपविभागीय अभियंता आमसभेत गैरहजर होते याची दखल आमदार वाघमारे यांनी घेतली.
शिक्षण विभागाचा आढावा सुमारे एक तास घेण्यात आला. जि.प. शाळेत शिक्षकांची रिक्त पदे ३७ ाहेत. शिक्षक गैरहजर राहणे यांच्या तक्रारी सरपंच व उपसरपंचानी केल्या. शालेय पोषण आहारात सतर्कता बाळगण् याची गरज असून मुख्याध्यापकासह गटशिक्षणाधिकारी अडचणीत येतील अशी समज आ.वाघमारे यांनी दिली. चांदपूर येथील शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला गावाचे नाव इंग्रजीत लिहीता आले नाही. गुणवत्ता विकास केवळ कागदोपत्री आहे. शालेय पोषण आहार संदर्भात पत्र पाठविण्यात आले त्या पत्राचे उत्तर गटशिक्षणाधिकारी सी.आर. नंदनवार यांनी दिले नाही. वीज वितरण कंपनीच्या विरोधातही सरपंच व उपसरपंचानी तक्रारी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना समस्या त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश आ.वाघमारे यांनी दिले. देव्हाडी येथील कनिष्ठ अभियंता गवते यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना दिल्या. सर्वच विभागावर लोकप्रतिनिंचा रोष दिसून आला.
आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, सभापती संदीप टाले, पंचायत समिती सभापती कलाम शेख, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, खंडविकास अधिकारी स्नेहा कुळचे, तहसीलदार सचिन यादव, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव कहालकर, अशोक उईके, राजेश पटले, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थही उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Throng in the Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.