नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: January 1, 2023 08:58 IST2023-01-01T08:56:03+5:302023-01-01T08:58:32+5:30

राष्ट्रीय महामार्गावर जवाहरनगर येथील घटना

Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire | नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

भंडारा : नववर्षाच्या सकाळी बर्निंग मिनी ट्रकचा थरार राष्ट्रीय महामार्गावर भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथे सकाळी ७.३० पहायला मिळाला. कापूस घेऊन जाणारा मिनी ट्रक जळून खाक झाला.

नागपूर जिल्ह्यातील मौदा येथून कापूस घेऊन एक मिनी ट्रक रविवारी सकाळी भंडाऱ्याकडे येत होता. दरम्यान, जवाहरनगरजवळ पोहचताच अचानक धुर निघाल्याने चालकाने ट्रक थांबविला. स्वत:सह क्लीनर बाहेर आले. काही क्षणात बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.

या घटनेची माहिती भंडारा अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे  प्रयत्न केले. मात्र कापसासह संपूर्ण मिनी ट्रक जळून खाक झाला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती.

Web Title: Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire

टॅग्स :fireआग