'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड

By Admin | Updated: December 18, 2015 00:56 IST2015-12-18T00:56:35+5:302015-12-18T00:56:35+5:30

शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणात जुना वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि.३० नोव्हेंबरला घडली होती.

Three accused in the 'assault' case | 'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड

'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड

तुमसरातील प्रकार : गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांची कारवाई
तुमसर : शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणात जुना वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि.३० नोव्हेंबरला घडली होती. तेव्हापासून घटनास्थळावरून फरार तीन आरोपींना काल १६ डिसेंबरला रात्री ८.३० च्या सुमारात आंबेडकर वॉर्डातून गजाआड करण्यात तुमसर पोलिसांना यश आले आहे.
रफिक निशार शेख (२९) रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, महेश उर्फ रॉकी प्रकाश वासनिक (२४) रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार (२३) रा. कुंभारेनगर तुमसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.२९ नोव्हेंबर रोजी गंभीर जखमी प्रफूल उर्फ कान्या प्रभू गभने वय २५ वर्ष रा. कुंभारेनगर तुमसर हा नागपुरहून त्याच्या लहान भावास व लहान ताईस भेटण्यास आल्याची माहिती वॉर्ड व नगरातील काही युवकांना मिळाली होती. ती माहिती अन्य इसमांना दिल्याने हे तिघेही प्रफुलच्या शोधात फिरत होते. या दरम्यान प्रफुल उर्फ कान्या हा नेहरू शाळेलगतच्या पानटपरीवर बसला असताना काही कळायच्या आत त्याला पकडून फरफटत नेहरू शाळेच्या पटांगणावर नेण्यात आले. अंधार असलेल्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर अवस्थेत कोणीतरी येत असल्याचे पाहून चार जण घटनास्थळावरून पसार झाले होते. चारपैकी एक आरोपी श्रीकांत उर्फ डोडल हटवार (२६) रा. कुंभारेनगर याला अटक करण्यात आली. परंतू उर्वरित आरोपी तुमसर बाहेर पडून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून तुमसर पोलीस त्यांच्या मार्गावर होती. परंतु आरोपीचा काही सुगावा लागला नव्हता. दरम्यान दि.१६ डिसेंबरला तिन्ही आरोपी तुमसरात दाखल झाल्याची माहिती खबऱ्यांनी देताच तुमसर पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या घरातूनच अटक केली आहे. तुमसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम १४५, १४७, १४८, १४९, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three accused in the 'assault' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.