लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर ते बपेरा राज्य मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघात बुधवारी पहाटे झाले. रुग्णवाहिकेच्या अपघातात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णाचा मृत्यू तर तीन नातेवाईक जखमी झाले. तसेच काळीपिवळी पुलाच्या कठड्याला धडकली. तर तिसऱ्या घटनेत एका बसने तीन शेळ्यांना चिरडले. एकाच दिवशी झालेल्या या अपघाताने रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तुमसर बपेरा मार्गावर बावनथडी नदीच्या पुलावर काळीपिवळी चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप पुलाच्या कठड्यावर धडकली. रात्री ही घटना घडली. जीप पुलावरून लोंबकळत असल्याचे दिसून आले. सुदैवाने जीप नदीपात्रात कोसळली नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान याच मार्गावरून बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास रुग्णांना घेऊन एक रुग्णवाहिका जात होती. सिहोरा परिसरातील मोहगाव खदान गावाच्या नजीक चालकाचे नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा झाला. या घटनेची नोंद तुमसर पोलिसांनी घेतली. यात संजय बंसवाल (४०) रा.रामपायली या रुग्णाला घेऊन ही रुग्णवाहिका नागपुरकडे जात होती. अपघात होताच संजय बंसवाल यांचा मृत्यू झाला तर इतर चार नातेवाईक जखमी झाले. दरम्यान बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुमसरकडे जाणाºया एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९२४३ ने मच्छेरा गावाच्या शेजारी बुधराम पटले व अमृत पटले यांच्या मालकीच्या शेळ्यांना चिरडले.
सिहोरा परिसरात एकाच दिवशी तीन अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:34 IST
तुमसर ते बपेरा राज्य मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघात बुधवारी पहाटे झाले. रुग्णवाहिकेच्या अपघातात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णाचा मृत्यू तर तीन नातेवाईक जखमी झाले.
सिहोरा परिसरात एकाच दिवशी तीन अपघात
ठळक मुद्देरुग्णाचा मृत्यू : काळीपिवळी पुलाच्या कठड्यावर धडकली, बसने शेळ्यांना चिरडले