साकोली तालुक्यात व्याघ्र हल्ल्याची पुन्हा तिसरी घटना; शेतावर गेलेल्या महिलेवर हल्ला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:09 IST2026-04-01T12:07:56+5:302026-04-01T12:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : साकोली तालुक्यातील आमगाव या गावाच्या शेतशिवारात आज पुन्हा वाघाने शेतावर गेलेल्या एका महिलेवर हल्ला ...

साकोली तालुक्यात व्याघ्र हल्ल्याची पुन्हा तिसरी घटना; शेतावर गेलेल्या महिलेवर हल्ला, गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साकोली तालुक्यातील आमगाव या गावाच्या शेतशिवारात आज पुन्हा वाघाने शेतावर गेलेल्या एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. छाया मुंगमोडे ( ४३) असे या महिलेचे नाव असून तिला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेवर आणि कानाखाली गंभीर जखम झाली आहे. बुधवारी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शेत शिवारात ही घटना घडली.
या महिन्यात याच परिसरात घडलेली ही सलग तिसरी घटना आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी आपल्या मुलासह महफूल वेचण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर गेल्या शनिवारी उमरझरी शिवण आठवला येथील शिवारात माया रामकृष्ण सोनवणे या महिलेवर हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले होते सध्या तिच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत त्यानंतर आज बुधवारी ही तिसरी घटना घडली आहे.
या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले आहेत.