शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

केसलवाडा येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी पैसे ...

कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी असतानाही ऑक्‍सिजन बेडही मिळत नाहीत. आता तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी केसलवाडा येथे ऑक्सिजन बेडने युक्त स्वतंत्र कोविड रुग्णालय होणार आहे.

केसलवाडा (वाघ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची यासाठी निवड करण्यात आली आहे. याच परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार करण्यात येणार असून कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातच उपचाराची सोय व्हावी याकरिता आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या वतीने हे रुग्णालय स्थापन करण्यात येत असल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा तहसीलदार मलिक विराणी, समन्वयक नरेश नवखरे यांनी दिली.

शासनाच्या वतीने १०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालयाची संकल्पना राबविण्यात आली असून नव्याने तयार होणारे हे कोविड रुग्णालय अत्याधुनिक सर्व सोयी- सुविधायुक्त राहणार आहे. त्यामध्ये सर्व ७५ खाटांसाठी ऑक्सिजन व अतिरिक्त ऑक्सिजनची व्यवस्था असेल. जवळपास १०० खाटांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या रुग्णालयाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उइके, तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे समन्वयक नरेश नवखरे यांनी भेट दिली असून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे शुक्रवारी काँक्रिटीकरण करण्यात आले. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रात्रंदिवस युद्धस्तरावर काम सुरू आहे.