बोरी गावात चुली पेटल्याच नाही

By Admin | Updated: July 21, 2014 00:02 IST2014-07-21T00:02:01+5:302014-07-21T00:02:01+5:30

काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात तिघांना नियतीने हिरावले. बोरी गावातील तीन युवकांचा शनिवारी

There was no bole in the village of Bori | बोरी गावात चुली पेटल्याच नाही

बोरी गावात चुली पेटल्याच नाही

सर्वत्र हुंदके व स्मशानशांतता : तिघांवर काळाची झडप, प्रकरण पांजरा येथील अपघाताचे
युवराज गोमासे - करडी पालोरा
काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात तिघांना नियतीने हिरावले. बोरी गावातील तीन युवकांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाल्याने ४०० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या अपघातात गमावले गेल्याने सायंकाळी गावात स्मशानशांतता पसरली. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. तिघांवरही रविवारी रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही.
पांजरा नाल्यावरील पुलावर शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक भोलेश्वर चांदेवार (२३), उज्ज्वल ऊर्फ क्रांतिवीर परिहार (१७) व दिनेश मेश्राम (२६) या तिघांचा हकनाक जीव गेला.
तिघेही सरपंच भगवान चांदेवार यांच्या दुचाकीने पालोरा येथील आठवडी बाजाराला गेले होते. स्वगावी परत येत असताना रात्रीच्या अंधारात काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तिन्ही तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भोलेश्वरच्या तर छातीचा पिंजरा आत दाबल्या गेला होता. तिघांचेही दु:खाने विव्हळणे सुरु होते.
दगडालाही पाझर फुटला असता, अशा वेदनेत असलेल्या तिन्ही जखमींवर उपचारासाठी मदत देण्याऐवजी मानुसकी गमावलेल्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती होताच पालोरा, पांजरा व बोरी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी मदतीचा हात दिला.
या भिषण अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. रस्त्यावर दुचाकीचे तुकडे अस्तव्यस्त पडले होते. त्यावरूनच अपघाताची भिषणता लक्षात येत होती. करडी पोलिसांच्या मदतीने तिघांनाही भंडारा येथे उपचाराकरिता दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोलेश्वर व उज्ज्वल यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. गंभीर जखमी दिनेशला पुढील उपचाराकरिता नागपुरला हलविण्यात आले. दिनेश कुटुंबात एकुलता एक व घरातील कर्ता असल्याने गावात सर्वत्र मनोमन प्रार्थना होत असताना रविवारी दुपारी १२.३० वाजता वैद्यकीय महाविद्यालयात त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती धडकताच गावात स्मशान शांतता पसरली. आधीच गावातील दोन जीव गमविलेल्या गावकऱ्यांवर दिनेशच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली. जो तो आठवणीत गहिवरताना दिसत आहे.
सरपंच भगवान चांदेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तिघांवरही बोरी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाहीकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने बोरी गावात मात्र चुली पेटल्या नाही.

Web Title: There was no bole in the village of Bori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.