शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

साकोली शहरात एकही सुलभ शौचालय नाही; पाच वर्षात एकही नवीन शौचालय बांधले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:33 IST

'विना शौचालयाचे शहर' : सोशल मीडियातून उडविली जातेय खिल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : शीर्षक वाचून दचकलात ना... पण हे खरे आहे. पाच वर्षात साकोली नगरपरिषदेने एकही सुलभ शौचालय काय मूत्रीघरही निर्माण केले नाही. त्यामुळे सोशल मीडियात विना शौचालयाचे शहर, अशी खिल्ली उडविली जात आहे. दोन वर्षापासून साकोलीत प्रशासकराज सुरू आहे. परंतु, या काळातही जनतेला विश्वासात न घेता चक्क शासकीय पैशाची उधळपट्टी केली जात असताना साधे सुलभ शौचालय का बांधले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जुनी ब्रिटिशकालीन तहसील म्हणून साकोलीची ओळख आहे. सन २०१६ ला नगरपरिषदेची स्थापना झाली. पण, काहीच फायदा झाला नाही. साकोली पूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. फक्त एनएचएआय निर्मित उड्डाणपूल सोडला तर काहीही झालेले नाही. पूर्वीचे सोडले तरी पाच वर्षांत महामार्गावर महिलांसाठी व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय बांधण्याची कुणालाही मनातून इच्छा नव्हती काय, असा प्रश्न आहे. 

काही म्हणतात, नगरपरिषदेकडे शासकीय जागा नाही. मग, शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे हटवून शौचालय का निर्माण केले जात नाही. असाही सवाल उपस्थित होत आहे. मागील दोन वर्षांपासून येथे प्रशासक राज सुरू आहे. मागील व विद्यमान अधिकाऱ्यांनीसुद्धा हे धाडस का दाखविले नाही? मात्र, जेथे कमाई होईल, असे महान कार्य ते करून गेले. यात गरज नसताना जवळजवळ दोन फायबर स्पिड ब्रेकर थोपविणे, सोलर पथदिवे, ओला कचरा व सुका कचऱ्यासाठी प्लास्टिक बादल्या आणून लाखो रुपयांचा शासन निधी खर्ची घातला.

उघड्यावरच जावे लागते लघुशंकेला साकोली हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. हजारो नागरिक येत असतात. मात्र, त्यांना उघड्यावरच शौचास व लघुशंकेला जावे लागते.

टॅग्स :bhandara-acभंडाराSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान