शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५०० अधिकृत फटाका विक्रेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:14 IST

फटाक्यांची आतिषबाजी आणि दिवाळी यांचे अनन्यसाधारण नाते आहेत. दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या फटाक्यांची राखरांगोळी केली जाते. यातून प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआली दिवाळी : न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळापुढे आव्हान

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : फटाक्यांची आतिषबाजी आणि दिवाळी यांचे अनन्यसाधारण नाते आहेत. दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या फटाक्यांची राखरांगोळी केली जाते. यातून प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात रात्री ८ ते १० या वेळातच फटाके फोडण्याचे निर्बंध घातले आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात फटाक्यांचे ५०० अधिकृत विक्रेते असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अमंलबजावणी करण्याचे मोठे आव्हान प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांपुढे आहे.दिवाळीच्या काळात फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद लुटण्याची भारतीय परंपरा फार जुनी आहे. दिवाळी म्हणजे फटाके आणि फटाके म्हणजे दिवाळी असे समिकरण आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांची मोठी विक्री केली जाते. दिवाळीत तर चौकाचौकात फटाक्यांचे दुकाने लागतात. यासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागतो. भंडारा जिल्ह्यात अधिकृत ४९९ परवानाधारक फटाका विक्रेता आहे. अनधिकृत फटाका विक्रेत्यांची संख्याही कमी नाही. सर्वाधिक भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१२ फटाका विक्रेता आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात या काळावधीत कोट्यावधी रुपयांचे फटाके विकले जातात. अलीकडे फॅन्सी फटाक्यांची धुम आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषा निर्माण होते. धूर आणि आवाजाच्या प्रदुषणाने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच फटाक्यांमुळे विविध अपघातही झाले आहेत. अनेकांचे डोळे कायमचे गेले आहेत. शासन स्तरावर जनजागृती करुनही कोणताच उपयोग झाला नाही. फटाक्याचे भारतीय मानसाचे वेड कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत.अशातच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात रात्री ८ ते १० या दरम्यानच फटाके फोडण्याचे बंधन घातले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. परंतु दिवाळीच्या या आनंद सोहळ्यात कुणावर कारवाई कशी करावी, असा प्रश्नही त्यांच्यापुढे आहे. पंरतु कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनीच स्वत:हून निर्बंध घालून फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या कालावधीतच आतीषबाजी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.प्रदूषण मंडळाच्या कारवाईकडे लक्षन्यायालयाने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी केवळ दोन तास फटाके फोडण्याचे आदेश दिले असले तरी याचा परिणाम फटका विक्रेत्यांवर दिसून येत नाही. दिवाळीचा सणाला फटाके फोडून आनंद साजरा करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध आणल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आहेत. ही कारवाई प्रदूषण मंडळातर्फे करण्यात येणार आहे. मात्र येथील प्रदूषण मंडळ कार्यालयात रिक्त पदांची वाणवा आहे. किती जणांवर कारवाई होणार आता याकडे लक्ष आहे.