‘त्यांच्या’ स्वप्नांचा अर्ध्यावरच मोडला डाव...

By Admin | Updated: January 19, 2016 00:24 IST2016-01-19T00:24:29+5:302016-01-19T00:24:29+5:30

भविष्याची स्वप्ने बघायला सर्वांनाच आवडतं. सोनेरी स्वप्न वास्तवात कशी उतरतील याचा वेधही घेतला जातो.

'Their' dreams have been broken in half | ‘त्यांच्या’ स्वप्नांचा अर्ध्यावरच मोडला डाव...

‘त्यांच्या’ स्वप्नांचा अर्ध्यावरच मोडला डाव...

नववधूचा सिमला येथे मृत्यू : मोहाडी येथील दाम्पत्य
राजू बांते मोहाडी
भविष्याची स्वप्ने बघायला सर्वांनाच आवडतं. सोनेरी स्वप्न वास्तवात कशी उतरतील याचा वेधही घेतला जातो. पण, नियतीची दृष्टी त्या स्वप्नांचा कसा चुराडा करते याचा प्रत्यक्ष दु:खमय अनुभव मोहाडीतील गोमासे परिवाराला आला. दीड आठवड्यापूर्वी लग्न होवून पत्नीसह फिरायला गेलेल्या डॉ.शरद गोमासे यांच्या पत्नीचा सीमला येथील मंडी शहरात दुर्देवी मृत्यू झाला. अन् त्या जोडप्यांच्या भावविश्वाचा अर्ध्यावरच डाव मोडला.
लग्नानंतर दूरवर फिरायला जावे असे प्रत्येकच नवदांपत्यांना वाटत असते. जीवनातल्या अशा गोड आनंदात रममाण झालेला मोहाडी येथील डॉ.शरद गोमासे १३ जानेवारीला सीमला येथे नववधू अंकीतासह फिरायला गेला. नववैवाहिक जीवनाचा प्रारंभ अतिशय गोड व्हावा हा हेतू ठेवणारा शरद गोमासे हे साधारणत: दहा दिवसाच्या प्रवासासाठी निघाले होते. सदर दांपत्य आनंदाचे क्षण डोळ्यात साठवून २१ जानेवारीला परत मोहाडीला येणार होते.
नैसर्गिक सौंदर्याचा आनंद अन् जीवनाची स्वप्ने रंगवित असताना असताना १८ जानेवारीच्या पहाटे पत्नी अंकीता हिची प्रकृती अचानक बिघडली. तिला मंडी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. पण, पुढील उपचार तातडीने करण्यासाठी डॉक्टरांनी तिला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र वाटेतच अंकीताची प्राणज्योत मालविली. अंकीताचा मृतदेह दिल्ली येथे आणण्यात आले.
दिल्लीतच पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज रात्रीपर्यंत पत्नी अंकीताचा पार्थिव विमानाने आणण्यात येणार असून मोहाडी येथे १९ जानेवारीला तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेने गोमासे व मुटकुरे कुटंूबियावर दु:खाचे डोंगर कोसळले.

लग्न अन् मृत्यूचा दुर्दैवी योग
डॉ.शरद गोमासे यांचा ४ जानेवारीला नागपूर येथील ज्ञानेश्वर मुटकुरे यांची मुलगी अंकीताशी विवाह झाला. स्वप्नांची गुंफण विणत असतानाच नवदांपत्य दहा दिवसांसाठी सीमला व अन्य ठिकाणी फिरायला गेला होते. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या दिवशी ५ जानेवारी सोमवारी लग्न झाले त्याच दिवशी १८ च्या पहाटे अंकीताचा दुर्दैवी मृत्यू व्हावा असा दु:खमय योग गोमासे कुटुंबीयांच्या वाटेला आला.

Web Title: 'Their' dreams have been broken in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.