शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी बाळंतपणाला आलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

तीन तोळ्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २० हजार रुपये, एक तोळा वजनाचे लहान मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, सोन्याचे झुमके, सोन्याचे तीन तोळ्याचे दोन कंगण किंमत १ लाख २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाची बिंदिया, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, चांदीच्या तोरड्या, चांदीचा गुच्छा असे दागिने चोरीस गेले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कवरठी : माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेचे ३ लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सुभाष वाॅर्डात सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी वरठी ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.श्वेता कुलदीप पटले (३१), रा. सुखसागर, पुणे असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. पहिले बाळंतपण असल्याने श्वेता चंद्रपूर येथे आपल्या बहिणीकडे मार्च महिन्यात गेली होती. तिला तेथे तिला मुलगी झाली. त्यानंतर आराम करण्यासाठी ती माहेरी वरठी येथे मालू पिपरोदे यांच्याकडे आली होती. पुणे येथे घरी कुणीच राहणार नसल्याने तिने आपले सर्व दागिने सोबतच आणले होते. ते दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते.  रविवारी रात्री त्यांचे वडील हाॅलमध्ये दार उघडे ठेवून झोपले, तर आई व श्वेता वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपी गेल्या. सोमवारी सकाळी वडिलांना जाग आली, तेव्हा बॅग घराच्या मागच्या बाजूला पडलेली दिसली. त्यांनी ही माहिती आपल्या मुलीला दिली. तिने बॅगची पाहणी केली असता चोरट्यांनी तब्बल ३ लाख ४२ हजारांचे दागिने लंपास केल्याचे लक्षात आले. उघड्या दारातून चोरट्याने प्रवेश करून ही चोरी केली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील एका घरात याच रात्री चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी एका चोरट्याचा परिसरातील नागरिकांनी पाठलागही केला होता.या घटनेची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत. 

या दागिन्यांची झाली चोरी-  तीन तोळ्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २० हजार रुपये, एक तोळा वजनाचे लहान मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, सोन्याचे झुमके, सोन्याचे तीन तोळ्याचे दोन कंगण किंमत १ लाख २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाची बिंदिया, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, चांदीच्या तोरड्या, चांदीचा गुच्छा असे दागिने चोरीस गेले. 

 

टॅग्स :Thiefचोर