शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल महिन्यातच तलाव आटल्याने जलसंकट भेडसावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:13 IST

पाणी पातळी खालावली : जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ ३५ टक्के जलसाठा

भंडारा : जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प, २८ मालगुजारी तलाव या सर्व ठिकाणची पाणी पातळी निम्म्यावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कडक उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांशी तलाव आटले असून मोठ्या प्रकल्पातील जलस्तर खालावला आहे. त्यामुळे येत्या दिवसात जलसंकट भेडसावणार आहे. सध्या ४८.४५ दलघमी म्हणजे ३९.७९३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ५२.५३ दलघमी म्हणजे ४३.२४० टक्के पाणीसाठा होता.

भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी जलसाठा बघेडा जलाशयात ३५.३२४ आहे. तर सर्वांत जास्त जलसाठा सोरना जलाशयात ५५.२२२ टक्के आहे. चारही जलाशयांची पातळी ४८.४६४ टक्के आहे. लघु प्रकल्पांची संख्या ३१ आहे. त्यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, अंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली (ता. तुमसर), नागठाणा टांगा, हिवरा (ता. मोहाडी), आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी (ता. भंडारा), वाही, भिवखिडकी, कातुर्डी, पिलांद्री (ता. पवनी), शिवनीबांध, कुंभली, गुढरी (ता. साकोली), सालेबर्डी (ता. लाखांदूर), भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार (ता. लाखनी) या ३१ लघुप्रकल्पांचा समावेश असून येथे १८.६७१ दलघमी म्हणजेच ३४.८७२ टक्के जलसाठा आहे. 

या सर्व जलाशयांचा विचार केल्यास कुरमडा, पवनारखारी, परसवाडा, टांगा, हिवरा, डोडमाझरी, चिखलपहेला, रावणवाडी, कुंभली या जलाशयातील साठा कमालीचा खालावला असून ३० टक्क्यांच्या आत आहे. तर जवळपास १३ प्रकल्पातील जलसाठा ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

चारही मध्यमप्रकल्पातील जलसाठयात घटभंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना हे ४ मध्यम प्रकल्प आहेत. सध्या या चारही प्रकल्पात ४८.४६४ दलघमी २०.७५० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत ४५.५७२ टक्के दलघमी १९.५१२ असा उपयुक्त जलसाठा होता.

मालगुजारी तलावात अत्यल्प जलसाठाजुन्या मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. आजच्या स्थितीत २८ पैकी १३ तलावातील जलसाठा २५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. एकोडी, पाथरी, सावरबंध, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा या तलावात फक्त अल्प जलसाठा शिल्लक आहे. प्रखर उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच या तलावातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसाने काही अंशी जलसाठ्यात भर पडली आहे.

टॅग्स :Waterपाणी