शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

क्षुल्लक कारणावरून घराला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 5:00 AM

घटनेतील तक्रारकर्त्या महिलेने गत १ वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे १ लाख ५० हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. तथापि घराची विक्री करूनदेखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्या निवासी सुविधेने विक्री केलेल्या त्या घरात राहत होता. दरम्यान, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी घर खरेदीकर्त्या तक्रारदार महिला व तात्पुरत्या निवासी सुविधेने राहणाऱ्या युवकात अल्पश: मुद्यावर वाद झाला. या वादाने संतापलेल्या आरोपी युवकाने पुढील दिवशी सकाळच्या सुमारास घराला आग लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : गत एक वर्षापूर्वी एका महिला नातलगाने खरेदी केलेल्या घरात तात्पुरत्या निवासी सुविधेत राहत असलेल्या अन्य नातलगांनी अल्पश: वादावरून राहत्या घरात आग लावली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने घर विकत घेणाऱ्या अन्य नातलगांचे जवळपास १ लाख ५० हजार रुपयांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत घर विकत घेणाऱ्या महिला नातलगाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने अन्य नातलगाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील जैतपूर येथे घडली. या घटनेत स्थानिक जैतपूर येथील महानंदा गणपत डोकरे नामक घर खरेदी करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून स्थानिक जैतपूर येथील कोमल प्रकाश खऊल (२५) यांच्याविरोधात दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेतील तक्रारकर्त्या महिलेने गत १ वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे १ लाख ५० हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. तथापि घराची विक्री करूनदेखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्या निवासी सुविधेने विक्री केलेल्या त्या घरात राहत होता.दरम्यान, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी घर खरेदीकर्त्या तक्रारदार महिला व तात्पुरत्या निवासी सुविधेने राहणाऱ्या युवकात अल्पश: मुद्यावर वाद झाला. या वादाने संतापलेल्या आरोपी युवकाने पुढील दिवशी सकाळच्या सुमारास घराला आग लावली. या आगीत आरोपीचे विविध जीवनोपयोगी साहित्यासह एकूण १ लाख ५० हजार रुपयाचे घर जळून खाक झाले आहे. 

अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात- सकाळच्या सुमारास घराला आग लागली असल्याचे पाहून गावातील नागरिकांनी घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता लाखांदूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन मशीन चालक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घराला लागलेली आग नियंत्रणात आणली. पोलिसांत तक्रार दाखल केल्याने आरोपी युवकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास दिघोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे करीत आहेत.

 

टॅग्स :fireआग