नवीन पेन्शन योजनेची तिरडी बांधून काढली अंत्ययात्रा, कर्मचारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:57 IST2023-03-20T13:56:32+5:302023-03-20T13:57:09+5:30
संपाचा सातवा दिवस

नवीन पेन्शन योजनेची तिरडी बांधून काढली अंत्ययात्रा, कर्मचारी आक्रमक
इंद्रापाल कटकवार
भंडारा : राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्चपासून राज्यात बेमुदत संप पुकाराला आहे. सरकारकडून कोणताही निर्णय न झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहे.
संपाच्या सातव्या दिवशी भंडारा जिल्हा परिषद कार्यालय येथून नवीन पेन्शन योजनेची तिरडी बांधून त्रिमूर्ती चौकापर्यंत अंत्ययात्रा काढून प्रेत जाळून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यानंतर थाळी नाद आंदोलन करण्यात आले.