शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकच विद्यार्थ्यांचे खरे शिल्पकार

By admin | Updated: September 5, 2016 00:37 IST

विद्यार्थी घडविताना शिक्षकांसमोर अनेक आव्हाने असतात. मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुध्दीमत्ता, आकलन क्षमता यांचे तारतम्य जुळवून शिक्षक विद्यार्थ्यांना घडवित असतो.

आज शिक्षक दिन : विविध कार्यक्रमांचे आयोजनमुखरु बागडे पालांदूरविद्यार्थी घडविताना शिक्षकांसमोर अनेक आव्हाने असतात. मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुध्दीमत्ता, आकलन क्षमता यांचे तारतम्य जुळवून शिक्षक विद्यार्थ्यांना घडवित असतो. खऱ्या अर्थाने आई-वडीलानंतर शिक्षकच विद्यार्थ्यांचा खरा शिल्पकार असतो, असे प्रांजळ मत गुरुवर्यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाने पोलीस पदावर नियुक्त झालेल्या भाग्यश्री हत्तीमारे हिने व्यक्त केले. जिल्ह्यात आज सोमवारी गणरायांच्या आगमणासोबतच शिक्षकदिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आई-वडील व गुरुंच्या मार्गदर्शनामुळे पोलीस पदावर नियुक्त झालेल्या भाग्यश्री हत्तीमारे या तरुणीने आपले अनुभव कथन केले आहे.ढिवरखेडा येथील छोट्याश्या गावातील रहिवासी असलेल्या भाग्यश्री बेनिराम हत्तीमारे या तरुणीने कठीण परिश्रमातून हे यश संपादन केले आहे. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर बारावीचे वर्ष हे जिवनातील टर्निंग पॉर्इंट असते. याचवेळी शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडविणारे दिपस्तंभ असतात. आपणही शिक्षकांसारखे व्हावे, अशा आदर्श विद्यार्थ्यांसमोर नेहमी असतो. अकरावीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक विषयांचा अभ्यास कशा करावा याचे मार्गदर्शन प्रत्येक शिक्षकगण आपल्या गुणवत्तेनुसार करीत असतात. प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनामुळेच पदवी परिक्षा उत्तीर्ण करुन पोलीस पदावर नियुक्तीचा मान मला मिळाला आहे. ग्रामीण क्षेत्रात राहूनही ‘बेटी बचाव, बेटी पढाओं’ हा मंत्र त्यांनी आम्हाला दिला. मुलींनी किमान पदवीपर्यंत शिक्षण द्यावे नंतरच त्यांचा लग्नाचा विचार करावा, हा विचार त्यांनी रुजविला. आत्मबळ, आत्मविश्वास व योग्य मार्गदर्शन यामुळेच स्पर्धा परिक्षांचा खडतर मार्ग पुर्ण करता आला. पदवीधर झाल्यावर अनेक तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षक किंवा गुरुंचे मार्गदर्शन अश्यावेळी आवश्यक असते. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर चौ. येथे बारावीपर्यंतचे शिक्षण आटोपल्यानंतर संताजी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. ढिवरखेडा या लहानश्या गावातून कुणीतरी यश कमावेल, अशी आशा कुणी बाळगली नव्हती. मात्र गुरुंच्या मार्गदर्शनामुळे छोट्याशा क्षेत्रातील भाग्यश्री नामक ही तरुणी यशाच्या शिखरावर पोहचली आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गणरायांच्या आगमणासोबतच शिक्षक दिनाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात साजरा केले जाणार आहे.