शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा टिकविण्याची जबाबदारी शिक्षकाची

By admin | Updated: February 12, 2015 00:38 IST

सरकारी शाळेत भौतिक सुविधांसह दर्जेदार शैक्षणिक साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले. पण सरकारी शाळेकडे पालकांनी पाठ फिरविली आहे.

वरठी : सरकारी शाळेत भौतिक सुविधांसह दर्जेदार शैक्षणिक साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले. पण सरकारी शाळेकडे पालकांनी पाठ फिरविली आहे. याकरिता शिक्षकांनी आत्मचिंतन करून दर्जेदार शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. सरकारी शाळा टिकविणे ही शासनाची जबाबदारी नसून ती शिक्षकाची आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे 'माझी मुलं, माझी शाळा' या उपक्रमांतर्गत शालेय स्नेह संमेलन उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांचे हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांच्या अध्यक्षतेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, केंद्रप्रमुख जयंत उपाध्ये, थारनोद डाकरे, चेतन डांगरे, चांगदेव रघुते, सुनीता बोंदरे, महादेव मते, घनश्याम बोंदरे, मिलिंद धारगावे, कैलाश कारेमोरे, राजू केवट, बाबूलाल बोंदरे उपस्थित होते. यावेळी राजू कारेमोरे यांनी शाळेच्या प्रवेशासाठी शारदा मातेची दान दिलेल्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वाघमारे यांनी शाळेतील भौतिक सुविधा अंतर्गत इमारत व बगीचे तयार करण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत ज्ञानाचे बगिचे तयार झाले पाहिजे असे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना सांस्कृतिक कार्यक्रमातून जशी चालना मिळते, त्याप्रमाणे शैक्षणिक प्रगती दिसायला पाहिजे असे सांगितले. संचलन विठ्ठल चचाणे, प्रास्ताविक मुख्याध्यापक फंदू धुर्वे व आभार बाबूलाल बोंदरे यांनी मानले. कार्यक्रमास सहायक शिक्षिका यमुना आकरे, उज्ज्वला टिचकुले, वनमाला निनावे, नलिनी मेश्राम, नरेश कोल्हे, नाझिया शेख, रंजना लिल्हारे, सय्यद माटे, वैभव ठाकूर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख पूर्वा शेंडे, ओमप्रकाश शेंडे, अल्का बुरबादे, वीणा नागलवाडे, अंजना सिंधीमेश्राम, निशा बोंदरे, गीता माटे, अनिता रामटेके, नंदा पटले, सपना बनोटे, स्वाती साठवणे उपस्थित होत्या. (वार्ताहर)