शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बुडणाऱ्या जहाजमधील प्रवासी

By admin | Updated: September 25, 2014 23:19 IST

शिक्षकांची स्थिती ही टायटॅनिक जहाजात बुडालेल्या प्रवाशासारखी आहे. सध्या शिक्षणाचे विशाल जहाज बुडाले नसले तरी ते यात प्रवाशासाठी बसलेल्या प्रवाशांना सुखरुप नेऊ शकत नाही अशी अवस्था आहे.

वरठी : शिक्षकांची स्थिती ही टायटॅनिक जहाजात बुडालेल्या प्रवाशासारखी आहे. सध्या शिक्षणाचे विशाल जहाज बुडाले नसले तरी ते यात प्रवाशासाठी बसलेल्या प्रवाशांना सुखरुप नेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. शिक्षणाच्या या जहाजात प्रवास करणाऱ्यांनी जगाला ज्ञान देण्याचे स्वप्न पाहले. पण त्यांच्या पूर्ततेसाठी असलेली अज्ञानी सरकारी यंत्रणा व असंघटीत प्रवाशामुळे शिक्षकाची वाईट अवस्था आहे. ते यातून बाहेर पडले तर बुडणार व प्रवासादरम्यान ही बुडणार हे आता नक्की झाले आहे. यापासून बचाव करायचा असेल तर सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी झटणे व अधिकार प्राप्तीसाठी संघटीत होण्याचे आवाहन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा भंडाराच्या वतीने आयोजित मोहाडी तालुका शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या १०० च्या वर शिक्षकांनी हजेरी लावली होती. अध्यक्ष म्हणून विभागीय अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, अंगेश बेहलपाडे व राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी उपस्थित होते.यावेळी सर्व विभागाच्या शिक्षकांच्या समस्या, गुणवत्ता वाढ, कलम २५ व, कलम २६ अ, जि.प. कर्मचाऱ्याचे विलंबाने होणारे वेतन, शिक्षकांचे समायोजन, कनिष्ठ महाविद्यालयाचे अतिरिक्त ठरलेले शिक्षकाचे समायोजन यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व यांनी उत्तरे दिली. शिक्षक आमदार म्हणून नागो गाणार यांनी शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नांना आलेले यशाचे पाढा वाचून सांगून शिक्षण क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना एन्टी करप्शन ब्युरोच्या मार्फत पकडून द्या, त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार, अशी माहिती त्यांनी दिली. संचालन प्रा.जितेंद्र टिचकुले व आभार प्रा.शशांक चोपकर यांनी मानले. कार्यक्रमात गुणवंत क्षीरसागर, प्रा.ईश्वर चव्हाण, मुकेश कुर्झेकर, गणेश सार्वे, प्रा.प्रशांत धकाते, माधुरी घोडेस्वार, संदीप बचेरे, प्रा.रविंद्र धुर्वे, दोनाडकर, प्रा.प्रेमा बेदरकर, सुधाकर लोणारे, संतोष चेटुले, एस.एम. लंजे, प्राचार्य अशोक गजभिये, प्राचार्य दयाळनाथ माळवे, प्रा.टिंगणे, ऋषीकेश डोंगरे, कामडी, रविंद्र गायकी, प्रा.नंदा उके, शैलेश कोकाटे, युवराज गुंजेवार व राजेश रामटेके उपस्थित होते. (वार्ताहर)