शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द धरणावर ताट-वाटी, घागर मोर्चा

By admin | Updated: November 25, 2014 22:49 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी

मोबदला देण्याची मागणी : आणखी किती दिवस करायचा संघर्ष- प्रकल्पगोसेबुज : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ताट, वाटी, चमचे वाजवित गुंड घागरी, मासे पकडण्याचे धुटी घेऊन गोसीखुर्द धरणावर मोर्चा काढला. संतप्त आंदोलनकर्ते सुरक्षेचे कडे तोडून मुख्य धरणापर्यंत पोहोचले.या मोर्चात पिण्याच्या पाण्याच्या समस्येकरिता घागरी, अन्न सुरक्षेकरिता ताट, वाटी, चमचे, शिक्षण व प्रशिक्षण, नोकरी, रोजगार या समस्येकरिता पाट्या व नदीवरील उदरनिर्वाहाकरिता मासेमारांचे साहित्य असलेले धुट्या, पेलण्या, जाळे घेऊन प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले. सकाळी ११ वाजतापासून बुडीत क्षेत्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पाथरी पुनर्वसन ठिकाणी येणे सुरु झाले. हजारो प्रकल्पग्रस्त जमा झाल्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पाथरी, पेंढरी, मेंढा, जामगाव, गिरोला, चिचखेडा, नवेगाव, गोसेबुज, गाडेघाट, घाटउमरी, सौंदड, मालची, गोसीखुर्द, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले. संघर्ष हमारा नारा है, प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी द्या, प्रकल्पग्रस्तांना पैसा द्या आदी घोषणांसह ताट, वाटी, चमचे वाजवून प्रकल्पग्रस्तांनी परीसर दनाणून सोडला होता. मोर्चा मार्गक्रमण करीत २ वाजता धरणावर जलविद्युत निर्मीती प्रकल्पाजवळ पोहोचताच तेथील सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पग्रस्तांनी मुख्य धरणापर्यंत धडक दिली.मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेमध्ये गावागावातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रकल्पग्रस्तांना सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्यात नोकरी मिळावी, व्यवसायाकरिता १२ लाख रुपयांचे पॅकेज प्रत्येक कुटुंबाला मिळावे, प्रकल्पग्रस्तांना पेंशन मिळावी, जलाशयात मासेमारीचा हक्क मिळावा, १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन पॅकेज वाटपाचा हिशोब जाहीर करावा आदी मागण्या ठेवल्या. जेव्हापर्यंत शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांचे समाधान करणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा ईशारा दिला. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरुच होते.या मोर्चाचे आयोजन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केले होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, विठोबा समरीत, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी दादा आगरे, लक्ष्मीकांत तागडे यांच्या नेतृत्वात पाथरीच्या सरपंचा रिना भुरे, सोमेश्वर भुरे, विनोद शेंडे, गुलाब मेश्राम, सुनंदा समरीत, वामन सेलोकर, समीक्षा गणवीर, किशोर समरीत, स्मृती मेश्राम, केशव हटवार, प्रकाश मेश्राम, गणेश आगरे करीत आहेत. अड्याळचे पोलीस उपनिरीक्षक नेवारे हे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)